Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिध्दार्थ चांदेकर दिसणार 'या' नव्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 08:00 IST

अभिनेता सिध्दार्थ चांदेकर ‘सिनेमा कट्टा’ या चॅट शो मध्ये निवेदकाची भूमिका साकारणार आहे. खरं तर सिध्दार्थचा हा पहिलाच चॅट शो आहे

ठळक मुद्देसिध्दार्थ या चॅट शोला घेऊन अतिशय उत्साही आहे

कलाकारांच्या चित्रपट, नाटक, मालिका याविषयी जाणून घेण्यात अनेकांना रस असतो पण या व्यतिरिक्त अजून काही जाणून घ्यायला मिळावं अशी इच्छा तर प्रेक्षकांची नक्कीच असते. प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेता शेमारु एंटरटेनमेंट लिमिटेड कंपनी खास प्रेक्षकांसाठी ‘सिनेमा कट्टा’ हा अनोखा चॅट शो घेऊन येत आहे.

अभिनेता सिध्दार्थ चांदेकर ‘सिनेमा कट्टा’ या चॅट शो मध्ये निवेदकाची भूमिका साकारणार आहे. खरं तर सिध्दार्थचा हा पहिलाच चॅट शो आहे आणि यामुळे सिध्दार्थ देखील त्याच्या या नवीन कामाविषयी अतिशय उत्साही आहे. या चॅट शोच्या निमित्ताने समोरच्या व्यक्तीला बोलकं करण्याची सिध्दार्थची नटखट सवय प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि कलाकाराविषयी अधिक माहिती देखील जाणून घ्यायला मिळेल. या चॅट शोमध्ये आतापर्यंत अशोक सराफ, महेश मांजरेकर, महेश कोठारे, अलका कुबल, उषा नाडकर्णी या आणि अशा आणखी दिग्गज कलावंतांशी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत आणि या गप्पांमधून त्यांचा फक्त या क्षेत्रातील प्रवासच नव्हे तर त्यांच्याविषयी आजवर फारशा माहीत नसलेल्या गोष्टीही लोकांना कळणार आहेत.

एकूणच मनोरंजन विश्वातल्या घडामोडी, कलाकारांच्या गमतीजमती, धमाल किस्से यांची रेलचेल असणारा ‘सिनेमा कट्टा’ या चॅट शो २० ऑक्टोबरपासून दर शनिवारी रात्री ८.३० वाजता टाटा स्काय मराठी सिनेमा, एअरटेल मराठी चित्रपट , डिश आपलं मनोरंजन, व्हिडीयोकॉन आपलं मनोरंजन या डीटीएच चॅनेल्सवर पाहता येईल.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकर