Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी 'डान्स+ ४' मंचावर आला सिद्धार्थ जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 06:30 IST

सिद्धार्थ जाधव नुकताच आपला आवडता स्पर्धक चेतन साळुंखेला प्रोत्साहन देण्यासाठी 'डान्स ४'च्या मंचावर आला होता. १८ वर्षीय पुण्याचा स्पर्धक चेतन साळुंखेच्या पॉपिंग कौशल्य पाहुन सिद्धार्थला प्रभावित झाला आहे

ठळक मुद्देतन साळुंखेच्या पॉपिंग कौशल्य पाहुन सिद्धार्थला प्रभावित झाला आहे

सिद्धार्थ जाधव नुकताच आपला आवडता स्पर्धक चेतन साळुंखेला प्रोत्साहन देण्यासाठी 'डान्स ४'च्या मंचावर आला होता. १८ वर्षीय पुण्याचा स्पर्धक चेतन साळुंखेच्या पॉपिंग कौशल्य पाहुन सिद्धार्थला प्रभावित झाला आहे आणि त्यामुळे त्याने ह्या शोमध्ये येऊन चेतनला समर्थन देण्याचे सरप्राईज दिले.

चेतन स्वतःच डान्स करायला शिकला आहे. चेतनाच्या घरची परिस्थिती बेताची आहे मात्र त्याचा  परिणाम त्याने आपल्या डान्सवर होऊन दिला नाही. त्याचे कौतुक करायचे सिद्धार्थने ठरवले. डान्सर बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करताना आलेल्या अडथळ्‌यांबद्दल चेतनला सांगताना सिद्धार्थने ऐकले आणि त्याबद्दल तो म्हणाला, “चेतनचा प्रवास हा मला खूपसा माझा वाटला. त्याला 'डान्स+ ४' मध्ये टॉप १० मध्ये पाहताना मला खूप छान वाटतंय. तो हुशार आणि मेहनती आहे. त्याचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. त्याने व्हिडीओज्‌ पाहून आणि सराव करून आपल्या डान्सिंग कौशल्यात भर टाकली. त्याच्या पॅशननेच त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली असून ह्या शोमध्ये येऊन त्याला सरप्राईज देऊन त्याला प्रोत्साहन द्यावे असे माझ्या मनात आले.''

आपल्या कलेने सर्वांना प्रभावित करून चेतनने ऑडिशनपासूनच मेंटॉर्स आणि सुपर जज रेमो डिसुझाकडून कौतुक मिळवले आहे. अर्थातच, ह्या सरप्राईजमुळे चेतन सातव्या आसमानात होता आणि खुद्द सिद्धार्थ जाधवसोबत मंचावर थिरकायला सर्वांनाच मजा आली. 

टॅग्स :डान्स प्लस 4सिद्धार्थ जाधव