Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी प्रवास करणार'मुंबई टू गोवा'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 15:56 IST

भिन्न स्वभावाच्या दोन व्यक्तींची मनं जुळतात तेव्हा  समजावं की ती  दोघं एकमेकांमध्ये गुंतली आहेत.कारण ब-याचदा प्रेमाची सुरूवातही रूसवे फुगवे ...

भिन्न स्वभावाच्या दोन व्यक्तींची मनं जुळतात तेव्हा  समजावं की ती  दोघं एकमेकांमध्ये गुंतली आहेत.कारण ब-याचदा प्रेमाची सुरूवातही रूसवे फुगवे यापासूनच होते असते. फक्त त्या गुंतण्याची जाणीव व्हावी लागते. ती झाली की प्रेमाचा अंकुर फुलायला वेळ लागत नाही. अनपेक्षितरित्या एका प्रवासात दोघांचं सोबत जाणं आणि तो प्रवास करता करता आयुष्याचाच प्रवास एकत्र करण्याचा विचार करणारं गुलाबी नातं जुळून येईल का ही कल्पनाच किती सुखावणारी आहे. 'प्रेम हे' या मालिकेतील नव्या एपिसोडमध्ये श्री आणि श्वेता यांच्या प्रेमाच्या नात्याची हीच गंमत रसिकांना अनुभवता येणार आहे. "मुंबई टू गोवा " हि प्रेम हे या मालिकेची नवीन गोष्ट आहे.श्री म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर हा इंजिनियरिंग स्टुडन्ट , मनसोक्त जगणारा, प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारा आणि नेहमी स्वप्नात रमणारा  सतत चेहऱ्याव स्मितहास्य,अगदी मुक्त मोकळ्या आकाशासारखा 'हॅपी गो लकी' श्वेता  म्हणजेच स्पृहा जोशी ही म्हणजे अगदी पुस्तकी कीडा जेव्हापासून हातात पुस्तक आलय ते आजपर्यंत कधी सुटलेच नाही.शालेय जीवनातही  फक्त अभ्यास आणि अभ्यासच केलाय. सतत ऑफिसची प्रेसेंटेशन्स, गॅझेटस, इलेक्ट्रॉनिक वस्तू , लॅपटॉप आणि मोबाईल  हेच तीच आयुष्य. या अशा दोन टोकाच्या स्वभावाच्या व्यक्तींमध्ये होणारी मजा हे पाहणे रंजक असणार आहे.वैभव तत्ववादी आणि तेजश्री प्रधान यांची मुख्य भूमिका असलेली "प्रेम हे " या मालिकेतील पहिली गोष्ट"रुपेरी वाळूत " या नावाने दाखवण्यात आली होती.ग्रामीण भागातील व्यक्त न झालेली ही प्रेम भावना रसिकांनाही पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळाले.