Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्वेता केसवानी झळकणार द ब्लॅकलिस्टमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 16:54 IST

श्वेता केसवानीने कहानी घर घर की, देस मैं निकला होगा चांद, बा बहू और बेबी यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका ...

श्वेता केसवानीने कहानी घर घर की, देस मैं निकला होगा चांद, बा बहू और बेबी यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. श्वेताच्या या मालिकांमधील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. तसेच नच बलिये या कार्यक्रमातदेखील ती झळकली होती. त्याचप्रमाणे तिने लव्ह इन नेपाल, बॅक अपसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आता तर ती एका अमेरिकन शोमध्ये झळकणार आहे. ही बातमी तिनेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवरून सगळ्यांना दिली आहे. छोट्या पडद्यावरचे अनेक कलाकार सध्या बाहेर देशातील मालिकांमध्ये काम करत आहे. एजाज खान, नौशिन अली सरदार, सारा खान यांनी पाकिस्तानमधील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. शाहीर शेख, रवी भाटिया, हर्षद अरोरा यांसारखे अनेक कलाकार सध्या इंडोनेशियातील मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहेत. आता यांच्यानंतर श्वेता केसवानीने एका बाहेर देशातील मालिकेमध्ये काम केले आहे. द ब्लॅकलिस्ट ही मालिका एनबीसी या वाहिनीवर दाखवली जात असून ती अमेरिकेत प्रचंड प्रसिद्ध आहे. ही मालिका एक क्राइम थ्रिलर असून या मालिकेचा चौथा सिझन सध्या सुरू आहे. या मालिकेचे तिन्ही सिझन खूपच गाजले होते. या मालिकेच्या चौथ्या सिझनमध्ये श्वेता काम करत आहे. श्वेता या मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतच राहात आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिचा फोटो पोस्ट करून त्यासोबत एनबीसी वाहिनीवरील ब्लॅकलिस्ट या कार्यक्रमात 23 फेब्रुवारीपासून मला पाहा असे लिहिले आहे. तसेच मी अमेरिकन टेलिव्हिजनवर पदार्पण करत असून यासाठी प्रचंड उत्सुक आहे असेदेखील म्हटले आहे.