Join us

श्वेता तिवारीचा युटर्न ! पुन्हा परतली दुस-या पतीकडे, दोघांच्या नात्यावर दिली अशी प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 15:41 IST

मुळची बिहारची असलेल्या श्वेता तिवारीने वयाच्या १८व्या वर्षी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील निर्माता राजा चौधरीसोबत पहिले लग्न केले होते.

चंदेरी दुनियेतील अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये श्वेता तिवारीचेही नाव घेतले जाते. श्वेताने  एक नाही तर दोन लग्न केली. 2013 मध्ये अभिनव कोहलीसह दुसरे लग्नकरत आयुष्याला नवीन सुरूवात श्वेताने केली होती. मात्र काही ना काही कारणावरून तिचे नाते फार काळ काही टिकले नाही. दुस-या पती अभिनव कोहलीसह तिचे बिनसले आणि घटस्फोट घेत  वेगळी राहत असल्याच्या माहिती समोर आली होती. 

अभिनवने रागाच्या भरात श्वेताची मुलगी पलकच्या कानशीलात मारल्यामुळे श्वेतानं थेट पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि अभिनव विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस स्टेशनला श्वेतानं भरपूर आरडा ओरडा करत आपली समस्या पोलिसांना समजावली. तेव्हा तिच्या सोबतीला तिची मुलगी पलक आणि श्वेताची आईसुद्धा होती. यावेळी श्वेतानं पोलिसांना अभिनव कायम दारूच्या नशेत असतो असं देखील सांगितलं. त्यानंतर अभिनवला पोलीस स्टेशनला बोलावलं गेलं आणि मग तब्बल ४ तास यावर चर्चा रंगली. त्यानंतर मात्र श्वेतानं तक्रार दाखल न करता आपआपसातच चर्चा करून यावर तोडगा काढायचा निर्णय घेतल्याचं बोलले गेले.

 मुळात श्वेता तिवारी कधी काय बोलेल याचा नेमच नाही. तिने दिलेल्या स्पष्टीकरणावर कितपत विश्वास ठेवावा हा ही मोठा प्रश्नच आहे. मध्यंतरी दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले होते की, अभिनव कोहली हा माझ्या आयुष्याला लागलेली एक कीड होती. त्याच्यापासून मी आता वेगळी झाल्यापासून मी खूप आनंदीत आहे. पतीपासून वेगळी झाल्यानंतर मी स्वतःला तंदरूस्त असल्याचे जाणवत असल्याचे श्वेताने सांगितले होते. 

टॅग्स :श्वेता तिवारी