Join us
Daily Top 2Weekly Top 5

 स्वत:चेच बोल्ड सीन पाहून घाबरली होती श्वेता तिवारी, अशी होती लेकीची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 11:13 IST

इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये श्वेताने पहिल्यांदा ‘हम तुम अ‍ॅण्ड देम’ या वेबसीरिजमध्ये इतके बोल्ड व किसींग सीन्स दिले आहे.

ठळक मुद्दे एकता कपूरच्या ‘हम तुम अ‍ॅण्ड देम’ या वेबसीरिजमध्ये श्वेता सिंगल  पॅरेन्टची भूमिका साकारत आहे.

पडद्यावर कधी नव्हे इतके बोल्ड सीन देणे श्वेता तिवारीसाठी तरी सोपे नव्हते. इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये श्वेताने पहिल्यांदा ‘हम तुम अ‍ॅण्ड देम’ या वेबसीरिजमध्ये इतके बोल्ड व किसींग सीन्स दिले आहे. हे इंटिमेट सीन देताना श्वेता तिवारीची अवस्था कशी असे, त्यामुळेच आपण समजू शकतो. हे सीन्स देताना श्वेता प्रचंड घाबरली होती. वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आणि ती पुन्हा घाबरली. आईला, कुटुंबाला आणि मुलीला हा ट्रेलर पाहून काय वाटेल? त्यांची प्रतिक्रिया काय असेल, ही भीती तिला सतावू लागली. 

  ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत खुद्द श्वेताने हा खुलासा केला. ‘ या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा मी प्रचंड घाबरले होते.  मी लगेच सीरिज निर्मात्यांना फोन केला आणि हे काय आहे? असे विचारले. मला ट्रेलर आवडलेला नाही, असेही मी सांगून टाकले. खरे तर मला कळत नव्हते आईला, कुटुंबीयांना आणि मित्र परिवाराला हा ट्रेलर कसा दाखवू. नंतर मी माझी मुलगी पलक हिला हा ट्रेलर दाखवला आणि तिचे मत विचारले. ट्रेलर पाहून ती जाम खूश झाली. आई ट्रेलर मस्त आहे. तिची ती प्रतिक्रिया ऐकून माझा जीव भांड्यात पडला. त्यानंतर कुठे मी तो शेअर केला आणि सोबत निर्मात्यांना फोन करून त्यांचीही माफी मागितली,असे श्वेता म्हणाली.

एकता कपूरच्या ‘हम तुम अ‍ॅण्ड देम’ या वेबसीरिजमध्ये श्वेता सिंगल  पॅरेन्टची भूमिका साकारत आहे. या सीरिजमध्ये श्वेता व तिचा सहअभिनेता अक्षय ओबेरॉय यांची जबरदस्त रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहायला मिळतेय. तिला तिच्याच वयाच्या व्यक्तीशी प्रेम होते. मात्र श्वेता एका मुलीची आई असते तर तिचा प्रियकर स्वत: तीन मुलांचा बाप असतो. अभिनेत्री श्वेता तिवारी काही दिवसांपूर्वी तिचा दुसरा पती अभिनव कोहलीसोबतच्या वादामुळे चर्चेत होती. आता श्वेता व अभिनव दोघेही विभक्त झाले आहेत आणि श्वेता आपल्या दोन्ही मुलांना एकटी सांभाळते आहे. 

टॅग्स :श्वेता तिवारी