श्वेता तिवारीचा दिसला अनोखा अंदाज; चाहत्यांनी म्हटले ‘So Cute’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 14:17 IST
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये तिचा अंदाज चाहत्यांना पसंत येत आहे. अनेकांनी त्यास चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
श्वेता तिवारीचा दिसला अनोखा अंदाज; चाहत्यांनी म्हटले ‘So Cute’
अभिनेत्री श्वेता तिवारी टीव्ही जगतातील अतिशय लोकप्रिय चेहरा आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक अॅक्टिव्हिटीजवर तिचे चाहते लक्ष ठेवून असतात. ३७ वर्षीय श्वेताने २००१ मध्ये ‘कही किसी रोज’ या टीव्ही शोमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. पुढे ती ‘बिग बॉस-४’ या अतिशय वादग्रस्त रिअॅलिटी शोची विजेतीदेखील ठरली. दरम्यान, श्वेता तिवारीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती मुलगा रेयांश कोहलीला खाऊ भरवताना दिसत आहे. श्वेता तिवारी सध्या लंडनमध्ये असून, हा व्हिडीओ तेथीलच आहे. श्वेताचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप पसंत येत आहे. त्यामुळे तिच्या या व्हिडीओला खूपच चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. यूजर्सनी यास क्यूट व्हिडीओ म्हणून कॉमेण्ट केल्या आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास सात लाखांपेक्षा जास्त वेळा बघण्यात आले आहे. श्वेता तिवारीला एकता कपूरच्या ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. २००४ मध्ये श्वेता पहिल्यांदा बिपाशा बसू स्टारर ‘मदहोशी’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. त्यानंतर ती ‘आबरा का डाबरा’ आणि ‘मिले न मिले हम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. याव्यतिरिक्त श्वेताने भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले.