Join us

"मला नोकराप्रमाणे वागणूक देते",घरगुती हिंसाचाराचा बळी ठरतोय या अभिनेत्रीचा पती, सोशल मीडियावर सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 12:35 IST

अभिनव सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेता खोटे बोलत असल्याचे आरोप करत आहे. याच दरम्यान अभिनव कोहलीने आश्चर्यचकीत करणारा खुलासा केला आहे.

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आहे. पती अभिनव कोहलीसोबत भलेही दोघे एका घरात राहतायेत मात्र त्यादोघांमध्ये मतभेद आहेत. एकीकडे अभिनव कोहली सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेताच्या संपर्कात असल्याचं सांगत आहे, तर दुसरीकडे श्वेता सांगत आहे की, ती अभिनवपासून दूर तिच्या मुलांसोबत राहत आहे. 

अभिनव सोशल मीडियाच्या माध्यमातून श्वेता खोटे बोलत असल्याचे आरोप करत आहे. याच दरम्यान अभिनव कोहलीने आश्चर्यचकीत करणारा खुलासा केला आहे. श्वेता तिच्या पतीला चांगली वागणूक देत नसल्याचा खुलासा खुद्द अभिनवने केला आहे. 'श्वेता मला माझ्या मुलांना भेटू देत नाही. शिवाय ती मला एखाद्या नोकरासारखी वागणूक देते.' असा खुलासा करत अभिनव कोहलीने श्वेता विरोधात आरोप केले आहेत. 

अनेक दिवसांपासून त्याला मुलगा रेयांशला भेटण्याची परवानगीही दिली नाहीय. काही दिवसांपूर्वी श्वेता तिवारीने अभिनवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला होता. ज्यानंतर अभिनवर विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती.  2012 श्वेताने राजा चौधरीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर  अभिनव कोहलीच्या ती प्रेमात पडली 3 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर  2013 मध्ये दोघांनी लग्न केले होते. 

टॅग्स :श्वेता तिवारी