Join us  

राजस्थानमध्ये श्वेता शिंदेने घेतला सुट्टीचा आनंद, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 4:52 PM

'अपराधी कौन' या मालिकेच्या सेटवर श्वेता आणि संदीप यांची ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. काहीच महिन्यांच्या अफेअरनंतर म्हणजेच 2007 मध्ये त्यांनी लग्न केले.

भटकंती कुणाला नाही आवडत. आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. इतके दिवस लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असलेले सगळेच आता मोकळा श्वास घेण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहे.

सर्वसामान्यापासून ते सेलिब्रेटींपर्यंत सारेच सध्या सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. अशात मराठमोळी श्वेता शिंदेने देखील तिचे व्हॅकेशन फोटो शेअर केले आहेत. राजस्थानमध्ये श्वेताने व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनयासोबतच तिला भटकंतीची फार आवड आहे. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ती आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असते.

अभिनेत्री सध्या श्वेता शिंदे 'डॉक्टर डॉन' मालिकेत झळकत आहे. श्वेताने ‘कुमकुम’, ‘घराना’ यांसारख्या हिंदी आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या मराठी मालिकांतील सशक्त भूमिकांमुळे प्रेक्षकांना परिचित असलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. श्वेताने मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदेने भूमिका साकारल्या होत्या.

श्वेताचा नवरादेखील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. श्वेताच्या पतीचे नाव संदीप भन्साळी असून त्याने वो रहनेवाली महलों की, इश्वर साक्षी, क्रीस औक कृष्णा, मोहिनी, प्यार के दो नाम-एक राधा एक श्याम यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

'अपराधी कौन' या मालिकेच्या सेटवर श्वेता आणि संदीप यांची ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. काहीच महिन्यांच्या अफेअरनंतर म्हणजेच 2007 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांनी पुण्यात अगदी मोजक्या नातलगांच्या उपस्थित लग्न केले होते. संदीप एक अभिनेता असला तरी तो सध्या अभिनयक्षेत्रापासून दूर आहे.

टॅग्स :श्वेता शिंदे