गेल्या काही दिवसात अनेक मराठी अभिनेत्रींनी गुडन्यूज दिली आहे. 'ठरलं तर मग' मधली अभिनेत्री मोनिका दबडेने लेकीला जन्म दिला. तिचं नाव वृंदा ठेवलं. तर अभिनेत्री, निर्माती शर्मिष्ठा राऊतच्या घरीही चिमुकलीचं आगमन झालं. तर अभिनेत्री अमृता पवारने गोंडस मुलाला जन्म दिला. आता आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. नुकतंच तिचं डोहाळजेवणही पार पडलं.
सध्या शुभ विवाह मालिकेत दिसत असलेली अभिनेत्री कुंजिका काळविंट (Kunjika Kalwint). मालिकेत ती पौर्णिमा ही निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारत आहे. कुंजिका आणि पती निखिल काळविंट लवकरच आई बाबा होणार आहेत. लग्नाच्या पाच वर्षांनंतर कुंजिका बाळाला जन्म देणार आहे. कुंजिका आठ महिन्यांची गरोदर आहे. नुकतंच तिचं डोहाळजेवण पार पडलं. हिरव्या रंगाची साडी, मोत्यांचे दागिने असा तिचा लूक होता. सध्या कुंजिका आणि निखिल दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कुंजिका सध्या स्टार प्रवाहवरील 'शुभ विवाह' मालिकेत दिसत आहे. याआधी तिने 'ती परत आलीये' या हॉरर मालिकेत काम केलं. 'स्वामिनी','चंद्र आहे साक्षीला' या मालिकांमध्येही ती होती. 'एक निर्णय' या सिनेमातही ती झळकली. पाच वर्षांपूर्वी कुंजिकाने निखिल काळवींटसोबत लग्नगाठ बांधली. निखिल काळविंट हा गिरगाव ढोल ताशा पथकाचा संस्थापक आहे.