Join us
Daily Top 2Weekly Top 5

शुभांगी-भरतची जमली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 13:12 IST

लापतागंज या मालिकेतील शुभांगी गोखलेच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. शुभांगी सध्या एका मराठी मालिकेत काम करत आहे. ती ...

लापतागंज या मालिकेतील शुभांगी गोखलेच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. शुभांगी सध्या एका मराठी मालिकेत काम करत आहे. ती आता पुन्हा हिंदी मालिकेकडे वळणार आहे. खटमल-ए- इश्क  या मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. गोव्यातील हवालदार एका मुलीच्या प्रेमात पडतो अशी या मालिकेची कथा आहे. विशाल मल्होत्रा या मालिकेत हवालदाराची भूमिका साकारणार आहे तर शुभांगी विशालच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. भरत दाभोळकरही अनेक वर्षांनंतर या मालिकेद्वारे अभिनयाकडे वळणार आहे. भरत या मालिकेत विशालच्या वडिलांची भूमिका साकारत आहे.