Join us
Daily Top 2Weekly Top 5

30 सप्टेंबरला देव-सोनाक्षीचं शुभमंगल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 15:36 IST

देव आणि सोनाक्षीच्या लग्नाला देवची आई ईश्वरीकडून होकार मिळत नव्हता त्यासाठी देवने सोनाक्षीशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मात्र ...

देव आणि सोनाक्षीच्या लग्नाला देवची आई ईश्वरीकडून होकार मिळत नव्हता त्यासाठी देवने सोनाक्षीशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मात्र देव सोनाक्षीच्या दुराव्यामुळे अस्वस्थ झाला होता. बरेच प्रयत्न करून देखील देव सोनाक्षी शिवाय राहु शकणार नाही. हे समजल्यावर ईश्वरी म्हणजेच देवच्या आईने या दोघांचे लग्न करून देण्याचा निर्णय घेतला आणि अखेर   'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेत रंगणार आहे एक भव्य लग्न सोहळा. सोनाक्षी आणि देव यांचा लवकरच लग्नसोहळा पार पडणार आहे. 30 सप्टेंबरला हा शुभमंगल सोहळा रसिकांना पाहता येणार आहे. त्यासाठी सध्या जोरदार तयारीही सुरू झालीय. मात्र या दोघांच्या लग्नानंतर या मालिकेत अनेक ट्विस्टसुद्धा येणार आहेत.