Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रेया बुगडे टॅटूच्या प्रेमात, पाहिलात का तिचा नवा टॅटू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 07:15 IST

श्रेयाने नुकताच नवा टॅटू बनवला असून सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरील कॉमेडी रिएलिटी शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर असो किंवा बॉलिवूडची चांदनी श्रीदेवी असो सगळ्यांची मिमिक्री श्रेया करते आणि सर्व प्रेक्षकांना ते आवडतं देखील.

श्रेया बुगडे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. इतकेच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या प्रोजेक्टबाबत अपडेट देत असते.नुकतेच तिने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती स्वतः दिसत नसली तरी तिने बनवलेल्या नवीन टॅटूबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. तिच्या या टॅटूवर खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत.

श्रेयाचा हा पहिला टॅटू नसून यापूर्वीदेखील तिने एक टॅटू बनवलेला आहे. तिने मनगटावर आराध्य असं लिहिलेलं आहे.याशिवाय तिच्या पाठीवर देखील टॅटू आहे.

'चला हवा येऊ द्या' या शोमधून श्रेयाला खरी लोकप्रियता मिळाली आहे. श्रेयाने अभिनयाच्या कारकीर्दीची सुरूवात फू बाई फूमधून मिळाली.

खरंतर शाळेत असल्यापासून श्रेया अभिनय करत होती. तेव्हा तिला आपण विनोदी कलाकार म्हणून ओळखले जाऊ असे वाटले नाही. कारण ती गंभीर भूमिका साकारीत होती.  त्यामुळे तिच्या आईला वाटायचं की कधीतरी तिला विनोदी भूमिका करायला मिळायला हवी. नंतर, 'फू बाई फू'च्या निमित्तानं तिला ती संधी मिळाली. 

टॅग्स :श्रेया बुगडेचला हवा येऊ द्या