Join us  

श्रेया बुगडे येलो रंगाच्या शर्टमध्ये दिसतेय स्टनिंग, फोटो पाहताच अमृता खानविलकर म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 7:30 PM

श्रेयाने गेल्या काही वर्षांत तिच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कार्यक्रमाला अनेक वर्षं झाली असून या कार्यक्रमाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून या कार्यक्रमातील सगळेच कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या कार्यक्रमाद्वारे डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात.

श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली. श्रेया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. श्रेयाने नुकताचे तिचे येलो रंगाच्या शर्टमधलं फोटोशूट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. यात ती स्टनिंग दिसते आहे. श्रेयाचा हा अंदाज तिच्या फॅन्ससह सेलिब्रेटीनाही प्रचंड आवडला आहे. अमृता खानविलकर ओहहो बेबी, अभिज्ञा भावेने लिहिले गुड चॉईस बेबी, सुयश टिळक आणि ऋतुजा बागवेनेदेखील तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे.

श्रेयाने गेल्या काही वर्षांत तिच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचसोबत समुद्र या नाटकात ती एका गंभीर भूमिकेत दिसली होती. या नाटकातील तिच्या आणि चिन्मय मांडलेकरच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते.

टॅग्स :श्रेया बुगडे