Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! या अभिनेत्रीने राहुल महाजनच्या श्रीमुखात लगावली, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 11:58 IST

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टीव्ही अभिनेत्री श्रेणु पारिखने राहुलच्या कानशिलात लागावली आहे.

ठळक मुद्देडान्स रिअॅलिटी शो ‘नच बलिए’च्या सेटवर हात उचलला आहे

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टीव्ही अभिनेत्री श्रेणु पारिखने राहुलच्या कानशिलात लागावली आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात श्रेणु राहुलवर  डान्स रिअॅलिटी शो ‘नच बलिए’च्या सेटवर हात उचलला आहे पण तो डान्सचा एक भाग म्हणून.  

राहुल आणि श्रेणु नचच्या ग्रॅण्ड प्रिमियरमध्ये परफॉर्म करणार आहे. सध्या त्यांचा डान्सच्या रिहर्सल सुरु आहेत. डान्सचा एक भाग म्हणून श्रेणुने त्याला मारलं आहे. सेकंड हँड जवानी या गाण्यावर दोघे थिरकताना दिसणार आहेत. 

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, राहुलला श्रेणु मारण्यास तयारच नव्हती. तिला संकोच आला होता मात्र राहुलने स्वत: तिची समजूत काढून तिला या गोष्टीसाठी तयार केले. त्यानंतर श्रेणु हा सीन करण्यास तयार झाली.   

त्यानंतर श्रेणु म्हणाली, ''राहुलसोबत काम करण्याचा अनुभव वेगळा होता. त्याच्यावर हात उचलताना मला प्रचंड दडपण आले होते. कारण राहुल माझ्यापेक्षा कलाकार म्हणून मोठा आहे. मात्र त्याने मला स्वत:हुन प्रोत्साहन देऊन माझी हिम्मत वाढवली.'' 

श्रेणु ‘इश्कबाज’मध्ये गौरी शर्माच्या रूपात दिसली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. सध्या श्रेणु स्टार प्लसवरील ‘एक भ्रम सर्वगुण संपन्न’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसतेय. 

टॅग्स :राहुल महाजन