Join us

​श्रीजिता डेने कोई लौट के आया है या मालिकेसाठी सोडला बिग बॅनर चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 13:51 IST

कोई लौट के आया है ही एक रहस्यमय मालिका काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेत सुरभी ज्योती, ...

कोई लौट के आया है ही एक रहस्यमय मालिका काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेत सुरभी ज्योती, शरद केळकर, शोएब इब्राहिम, मीता वशिष्ठ आणि श्रीजिता डे यांच्या प्रमुख भूमिका आहे.सुरभी ज्योती या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे या मालिकेसाठी ती प्रचंड तयारी करत आहेत. या मालिकेतील कथा ही पुनर्जन्मावर आधारित असल्याने आपल्या पुनर्जन्माविषयी जाणून घेण्यासाठी तिने संमोहनशास्त्राची मदतदेखील घेतली होती. तर शोएब इब्राहिम या भूमिकेसाठी सध्या वजन कमी करत आहे. त्याने या मालिकेसाठी आतापर्यंत जवळजवळ 20 किलो वजन कमी केले असून या मालिकेत तो सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रीजिता या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. श्रीजिताने आतापर्यंत कसोटी जिंदगी के, कसम से, पिया रंगरेझ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती टशन, लव्ह का द एंड, मान्सून शूडआऊट यांसारख्या चित्रपटातही झळकलेली आहे. चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्यामुळे तिला नेहमीच चित्रपटाच्या चांगल्या ऑफर्स येत असतात. काही दिवसांपूर्वीदेखील तिला एका बिग बजेट चित्रपटाची ऑफर आली होती. पण सध्या कोई लौट के आया है या मालिकेकडे लक्ष केंद्रित करायचे असल्याने तिने ही ऑफर नाकारली. याविषयी श्रीजिता सांगते, "मला एका बिग बजेट चित्रपटाची ऑफर आली होती हे खरे असले तरी मी तो चित्रपट स्वीकारलेला नाही. मी सध्या कोई लौट के आया है या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र आहे आणि मला सगळा वेळ हा याच मालिकेला द्यायचा आहे आणि त्यामुळे मी चित्रपटाची ऑफर नाकारली. मी हिंदीसोबतच अनेक बंगाली चित्रपटातदेखील काम केले आहे. चित्रपटात काम करायला तर मला खूप आवडते. भविष्यात मी चित्रपटात झळकताना नक्कीच पाहायला मिळेल. पण सध्या तरी मी सगळा वेळ कोई लौट के आया है या मालिकेला देण्याचे ठरवले आहे."