Join us

'मरियम खान रिपोर्टिंग लाईव्ह'मध्ये श्रिया पिळगांवकरची होणार एंट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 16:17 IST

सचिन पिळगावकर यांची एकुलती एक कन्या श्रिया पिळगांवकर आता छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. स्टार प्लसवरील आगामी शो ...

सचिन पिळगावकर यांची एकुलती एक कन्या श्रिया पिळगांवकर आता छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. स्टार प्लसवरील आगामी शो ‘मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे.श्रियाने अनेक लघुपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली असून शाहरूख खानचा चित्रपट ‘फॅन’मध्ये तिने काम केले आहे. मदिहा ऊर्फ रूखसार रेहमान यांची मोठी मुलगी मेहेरची भूमिका साकारण्यासाठी श्रियाला विचारण्यात आले. पण हातात अगोदरच बरेच काम असल्यामुळे ती ह्या शोमध्ये येऊ शकली नाही.ती ह्या शो चा हिस्सा बनेल अशी निर्मात्यांना अजूनही आशा असून मरियम खान रिपोर्टिंग लाईव्हसोबत ती टीव्हीवर पदार्पण करेल की नाही हे खुद्द श्रियाच सांगू शकेल. ह्या शोमध्ये एसएम झहीर,खालिद सिद्दिकी, रूखसार रेहमान, देशना दुगाड यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.किंग खानचा फॅन या चित्रपटाने एका दिवसात बॉक्सआॅफीसवर करोडो रूपयांची कमाई केली होती.तसेच शाहरूखच्या फॅन या चित्रपटामध्ये श्रिया पिळगावकर असल्याची चर्चा देखील रंगली होती. पण खुद्द बॉलिवूडच्या या तगडया कलाकाराने एका कार्यक्रमा दरम्यान आपल्या मराठीमोळया श्रिया पिळगावकरचे भरूभरून कौतुक केले होते.शाहरूख म्हणाला, श्रिया ही खूप कमालची अ‍ॅक्टर आहे. तिच्यासोबत काम करताना खूप मजा आली.तसेच या चित्रपटाची शुटिंग एक वर्षापूर्वी संपल्यामुळे अजून तिची आणि माझी भेट नाही झाली नाही. त्यामुळे श्रियाला भेटायची इच्छा देखील शाहरूखने या कार्यक्रमात व्यक्त केली.शाहरूखचे हे कौतुकास्पद बोल ऐकता, श्रियाने याबाबत सोशलमिडीयावर  भावना व्यक्त केली की, एवढया मोठया कलाकारांकडून कौतुकाची थाप मिळाली असता, जगातील सर्वात मोठी स्माइल माझ्या चेहºयावर दिसत आहे. तसेच यावेळी तिने शाहरूखचे आभार देखील मानले होते.