Join us
Daily Top 2Weekly Top 5

होणाऱ्या नवऱ्याची अट ऐकताच अभिनेत्रीने मोडलेला साखरपुडा, काही वर्षांनी मिळालं खरं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 16:32 IST

'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीने का मोडलेला साखरपुडा?

श्रद्धा आर्या (Shraddha Arya)टीव्ही इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्री आहे. 'मै लक्ष्मी तेरे आंगन की' मालिकेतून तिने पदार्पण केलं. 'पाखी' ही तिची सर्वात गाजलेली मालिका. यातील तिच्या पाखी या भूमिकेला खूप पसंत केलं गेलं. त्यानंतर तिला 'कुंडली भाग्य' मधून लोकप्रियता मिळाली. आजही तिला डॉ प्रीता अरोडा याच नाव ओळखलं जातं. श्रद्धा आर्याने काही वर्षांपूर्वी तिचा साखरपुडा मोडला होता. होणाऱ्या नवऱ्याने ठेवलेली एक अट आणि तिने साखरपुडा मोडला. काय होती ती अट?

श्रद्धा आर्या बऱ्याच वर्षांपासून छोट्या पडद्यावर राज्य करत आहे. 'कुंडली भाग्य' मधून ती घराघरात पोहोचली. 2006 साली श्रद्धाने तमिळ मूव्ही कलवानिन कडाली मधून पदार्पण केलं होतं. यानंतर तिने राम गोपाल वर्मा यांच्या 'नि:शब्द' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ती शाहीद कपूरच्या 'पाठशाला' मध्येही दिसली. प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं पण वैयक्तिक आयुष्यात तिला काही समस्यांचा सामना करावा लागला. श्रद्धाचं एका बिझनेसमनसोबत लग्न ठकलं होतं. साखरपुडाही झाला होता. मात्र त्याने तिच्यासमोर एक अट ठेवली जी ऐकून श्रद्धाने रातोरात साखरपुडा मोडला. त्याने लग्नानंतर श्रद्धाला इंडस्ट्री सोडण्याची अट ठेवली जी तिने मान्य केली नाही. ही अट ऐकून हे नातं बरोबर नाही असंच तिला वाटलं. म्हणून तिने साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला.

काही वर्षांनी तिला आयुष्यभराचा जोडीदार मिळाला. 16 नोव्हेंबर 2021 रोजी तिने राहुल नागलसोबत लग्न केलं. श्रद्धा आज पतीसोबत सुखाचा संसार करत आहे. सोशल मीडियावर ती पतीसोबतचे रोमँटिक व्हिडिओ शेअर करत असते. आता श्रद्धा करिअर आणि संसार दोन्ही सांभाळत आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारलग्न