Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला पाहते रे' मालिकेच्या सेटवरील हा आहे शेवटच्या शूटिंगचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 17:23 IST

तुला पाहते रे ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला खूपच चांगला टिआरपी आहे. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

तुला पाहते रे ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला खूपच चांगला टिआरपी आहे. या मालिकेमध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे. इतके दिवस ईशा निमकरला पडलेले स्वप्न खरे आहे की खोटे, याचा उलगडा होत असताना आता ईशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सिद्ध झाले आहे आणि आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

या मालिकेतील आई साहेब म्हणजेच अभिनेत्री विद्या करंजीकर यांनी इंस्टाग्रामवर शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा फोटो शेअर करून ही माहिती चाहत्यांना दिली आहे. 

तुला पाहते रे मालिकेत ईशाला राजनंदिनीचं आयुष्य स्वप्नात दिसतं. त्यानंतर ईशाचा गोंधळ उडतो पण शेवटी ईशाला आपणच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याची खात्री पटते, तसंच तिच्या आयुष्याचं ध्येय देखील तिला कळतं. राजनंदिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि तिच्या मागच्या जन्माची देणी फेडण्यासाठी ईशाचा जन्म झाला आहे हे तिला उमगतं. आता ईशाने जयदीपच्या हाती व्यवसायाची सर्व सूत्रं दिली आहेत तसंच ऑफिसमध्ये परांजपे यांच्या मदतीने ती विक्रांतला धडा शिकवण्यासाठी योजना आखात आहे. 

इशा हीच राजनंदिनी असल्याचे आता इशाला कळले असून तिचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. इशा हीच राजनंदिनी आहे हे विक्रांतला केव्हा कळणार याचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

या मालिकेच्या शेवटी विक्रांतला त्याने केलेल्या गोष्टीचा पश्चाताप होईल का? इशा विक्रांतने केलेल्या कृत्याचा बदला घेईल का या प्रश्नांची उत्तरे काहीच दिवसांत मिळतील अशी आशा करायला हरकत नाही. 

टॅग्स :तुला पाहते रेझी मराठी