Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलेशियात सुरु आहे 'या' मालिकेचे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 20:00 IST

डॉक्टर आणि एक हानीकारक पत्नी अशी दुहेरी भूमिका अत्यंत कौशल्याने निभावणाऱ्या जिया शंकर ऊर्फ इराने फॅशनेबल साडीमध्ये तिची भूमिका फारच शिताफीने उचलून धरली आहे.

'मेरी हानीकारक बिवी' या &TV वरील मालिकेतले 'हानीकारक' जोडपे नेहमीच टिपीकल पारंपरिक पेहरावाला आकर्षक भारतीय पेहरावाचा मुलामा देऊन वावरताना आपण पाहिले आहे. डॉक्टर आणि एक हानीकारक पत्नी अशी दुहेरी भूमिका अत्यंत कौशल्याने निभावणाऱ्या जिया शंकर ऊर्फ इराने फॅशनेबल साडीमध्ये तिची भूमिका फारच शिताफीने उचलून धरली आहे. आपल्या ट्रेंडिंग आणि स्टायलिश कुर्त्यांनी जियाला फॉलो करत, करण सूचकनेही अखिलेश पांडे या आपल्या साध्या आणि निरागस पात्राला न्याय दिला आहे.

त्यांच्या या स्टाईल गेमला पुढे नेत तसेच, हेच दिसण्यातले तेज आणि सभ्यपणा कायम राखत, हे सुंदर जोडपे आता आपल्या मालिकेतील पात्रांना नवा लूक देणार आहे. नेहमीच्याच पारंपरिक साडीतून बाहेर येऊन, ही गुणी टीव्ही अभिनेत्री निळ्या रंगाच्या स्टायलिश मिडनाईट गाऊनमध्ये मलेशियात शुटिंग करताना दिसून आली. तिच्यासोबत करणसुद्धा त्याच्या काळ्या सूट आणि बो टायमध्ये तितकाच आकर्षक दिसत होता.

अशा आणखी एका शूटदरम्यान, या जोडप्याने आपल्या डे वेअर लूकने प्रेक्षकांना आकर्षून घेण्याचे ठरवले. जियाने शॉर्ट फ्लोरल ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता तर, हॅण्डसम करणने लाईट ब्लू शर्ट आणि डार्क ब्लू डेनिम्स असा साजेसा पेहराव केला होता.मलेशियाच्या रस्त्यावर चालताना, पडद्यावर हे जोडपे जितके छान दिसते, तितकेच त्यांच्या पाश्चिमात्य पेहरावात ते खुलून दिसत होते.

अखिलेशच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या वळणाच्‍या कथानकाचे चित्रीकरण सध्या मलेशियामध्ये सुरू असून 'मेरी हानीकारक बिवी'चे कलाकार मलेशियात आठवड्याभराच्या दौऱ्यावर गेले आहे.