Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shocking : शमा सिकंदर 'माया' वेबसीरिजमध्ये अशी झाली 'बोल्ड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 18:31 IST

शमा सिंकदर स्टारर ‘माया’ वेब सीरीजचा ट्रेलर लॉन्च.

हॉलिवूड सिनेमा ‘५० शेड्स ऑफ ग्रे’ वरुन विक्रम भट दिग्दर्शित शमा सिंकदर स्टारर ‘माया’ वेब सीरीजचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे.‘५० शेड्स ऑफ ग्रे’ या सिनेमातील बोल्ड सीन्समुळे या सिनेमाला भारतात बंदी करण्यात आली होती. अशात आता विक्रम भट हे आपल्या 'बोल्ड'वेब वेबसीरिजमधून धमाका करणार असल्याचे दिसतंय.सिनेमा ते टीव्ही असा प्रवास करणारी शमा सिकंदरने नुकतीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या वक्तव्यावरून चर्चेत आली होती. त्यानंतर व्हेकॅशनसाठी केपटाऊनमध्ये शमा सिकंदर बिकनीत दिसली त्यावेळीही ती चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा शमा चर्चेत आली आहे. ते ही विक्रम भट्ट यांच्या 'माया' वेबसीरिजमधून तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.शमा सिकंदरच्या घायाळ करणा-या अदांमुळे या वेब सीरीजने आतापासूनच पॉप्युलारिटी मिळवायला सुरूवात केली आहे.शमासोबत या वेब सीरिजमध्ये विपुल गुप्ता, वीर आर्यन आणि परीना चोप्रा हे दिसणार आहेत. विक्रम भट यांची ही वेबसीरिज २७ जानेवारी २०१७ ला रिलीज होणार आहे.