Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुंबईत भररस्त्यात अज्ञातांकडून प्रसिद्ध अभिनेत्रीवर हल्ला, अशी करुन घेतली स्वत:ची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 14:00 IST

लोकप्रिय मालिका 'कारभारी लयभारी'मधील एका अभिनेत्रीला काही लोकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोजच्याप्रमाणे गंगा शूटिंग संपवून घरी जायला निघाली होती. 

देशाची आर्थिक राजधानी मुंबई. मात्र याच महानगरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे.मुंबई शहर दिवसेंदिवस असुरक्षित होत चालले आहे. एरव्ही मध्यंरात्रीसुद्धा फिरताना मुंबई सुरक्षित वाटायची. मात्र आता दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र मुंबईत पुन्हा एकदा पाहायला मिळाले. लोकप्रिय मालिका 'कारभारी लयभारी'मधील एका अभिनेत्रीला काही लोकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोजच्याप्रमाणे गंगा शूटिंग संपवून घरी जायला निघाली होती. 

रोजच्या तिच्या बसस्टॉपवर ती बसची वाट बघत होती. तितक्यात काही लोकं आली आणि तिला मारहान करायला सुरुवात केली. गंगाने कशीबशी यातून सुटका केली आणि थेट घर गाठले. गंगावर हल्ला का केला गेला? हल्ला करणारी लोकं कोण होती याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाहीय,गंगाने खुद्द तिच्यावर ओढावलेला सगळा प्रसंग व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर सांगितला आहे.  

व्हिडीओमध्ये ती खूप घाबरेलेल्या अवस्थेत आणि रडत रडत स्वतःसोबत घडलेला प्रसंग सांगताना दिसत आहे. दरम्यान गंगाबरोबर घडलेला प्रसंग अतिशय धक्कादायक असून या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षा रामभरोसे आहे असे  म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. 

‘युवा डान्सिंग क्वीन’च्या निमित्ताने सध्या गंगा हे नाव भरपूर चर्चेत होते.या कार्यक्रमात सूत्रसंचालनात मराठी मालिका विश्वात पहिल्यांदा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला सूत्रसंचालनाची संधी मिळाली होती. गंगाचं खरं नाव प्रणित हाटे आहे.

 

गंगा आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. आता अभिनेत्री बनत ती मालिकेतही भूमिका साकारत आहे. मात्र प्रणितपासून गंगापर्यंतचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. 

या मुलाखतीत गंगाने सांगितले की, मी ट्रान्सजेंडर असल्याने मला अनेक वाईट अनुभवांचा सामना आजवर माझ्या आयुष्यात करावा लागला आहे. माझ्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग तर मी कधीच विसरू शकत नाही. मी एकदा एका रेल्वे स्टेशनवर रात्री 11 वाजता शुटींग करत होते.

 

त्यावेळी दिग्दर्शकाच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने अचानक पँटची झीप उघडली आणि तो अश्लील हातवारे करू लागला. त्या प्रसंगामुळे मी प्रचंड घाबरले. लोकांना अशाप्रकारे वागण्याचे धाडसच कसे येते हेच मला कळत नाही.