Shocking : शूटिंगसाठी आणलेल्या जर्मन शेपर्ड जातीच्या कुत्र्याने ‘या’ अभिनेत्रीवर केला हल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 21:46 IST
एका वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होणाºया ‘इक्यावन’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी प्राची तहलान हिच्यासोबत सेटवर एक अतिशय दुर्दैवी प्रकार ...
Shocking : शूटिंगसाठी आणलेल्या जर्मन शेपर्ड जातीच्या कुत्र्याने ‘या’ अभिनेत्रीवर केला हल्ला!
एका वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होणाºया ‘इक्यावन’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी प्राची तहलान हिच्यासोबत सेटवर एक अतिशय दुर्दैवी प्रकार घडला. होय, प्राचीला सेटवर कुत्र्याने चावले आहे. धक्का बसला ना? पण हे खरं आहे. अभिनयासाठी पॅशेनेट आणि हार्डवर्किंगसाठी ओळखल्या जाणाºया प्राचीने प्रसंगावधान राखत कुत्र्याला पळवून लावल्याने मोठी दुर्घटना टळली. त्याचे झाले असे की, मालिकेतील एका दृश्यात प्राचीला जर्मन शेपर्ड जातीच्या कुत्र्यासाठी शूटिंग करायची होती. मात्र याचदरम्यान ही दुर्घटना घडली. अचानकच हा कुत्रा प्राचीच्या अंगावर धावून गेला. त्याने चक्क तिचा पाठलाग केला. अशात प्राचीने स्वत:चा बचाव करण्यासाठी बाजूलाच असलेली एक काठी उचलून कुत्र्यास मारण्यास सुरुवात केली. मात्र अशातही त्याने तिला चावा घेतला. बराच वेळ रंगलेल्या या प्रकारानंतर कुत्र्याने धूम ठोकली. या घटनेबद्दल सांगताना प्राचीने म्हटले की, त्याने माझ्या शरीराच्या खालच्या भागावर हल्ला केला. काठी उचलण्याच्या नादात त्याने मला चावा घेतला. यात मी जखमी झाली आहे. दरम्यान, प्राचीला लगेच डॉक्टरांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्राचीने पुढे म्हटले की, मला लगेचच दोन इंजेक्शन घ्यावे लागले. तसेच आणखी पाच इंजेक्शन घेण्याचाही डॉक्टरांनी सल्ला दिला. दरम्यान, कुत्र्याने चावा घेतल्याने प्राचीला त्याच्या प्रचंड वेदना होत आहेत. मात्र अशातही ती पुढच्या एपिसोडची शूटिंग करीत आहे. डॉक्टरांनी तिला आराम करण्यास सांगितले आहे.