Join us
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास बसणार नाही;दया बेनलाही करावे लागले होते B Grade सिनेमात काम, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 12:10 IST

दया बेन साकारणारी दिशा वाकानीने मालिकेत येण्यापूर्वी वेगवेगळी काम केली आहेत.मालिकाच नाही तर सिनेमातही तिने काम केले आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेली दया बेन आज प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेत ती झळकत नसली तरी तिची लोकप्रियत तसूभरही कमी झालेली नाही.मालिकेत ती पुन्हा कधी परणार याकडेच तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.मालिकेतले जुने भाग आजही टीव्हीवर दाखवण्यात येतात. दया बेनमुळे जुन्या भागांनाही रसिक पुन्हा पाहणे पसंत करतात.

दया बेन साकारणारी दिशा वाकानीने मालिकेत येण्यापूर्वी वेगवेगळी काम केली आहेत. मालिकाच नाही तर सिनेमातही तिने काम केले आहे. दिशाने आपल्या कारकीर्दीत 1-2 नव्हे तर चक्क 9 सिनेमात काम केले आहे. सिनेमात काम केले असले तरी फारसे तिचे काम लोकांना माहितीच नाहीत.

सिनेमात काम करताना तिच्या वाट्याला हव्या तशा भूमिका आल्या नाहीत. तसेच कामाची सुरूवात करावी. काम मिळावे म्हणून येईल त्या ऑफर्स दिशाने सुरूवातीच्या काळात स्विकारल्या. म्हणून दिशाला सुरूवातील बी-ग्रेड सिनेमात काम करावे लागले.

1997 मध्ये दिशाला तिचा पहिला सिनेमा मिळाला. 'कामसिन - द अनटच' हा सिनेमा कधी आणि कधी गेला हे कोणालाच कळले नाही. त्यानंतरही दिशाने सिनेमात काम करणे सुरूच ठेवले. १९९९ मध्ये ‘फूल और आग’ सिनेमात तिला काम करण्याची संधी मिळाली .

सिनेमात मिथुन, जैकी श्रॉफ, हरीश आणि अरुणा ईरानीसारखे नावाजलेले कलाकार होते. या सिनेमात ही दिशाची भूमिका असूनही नसल्यासारखीच होती. आज नाही तर उद्या चांगल्या सिनेमाच्या ऑफर्स मिळतील म्हणून तिने येईल त्या सिनेमाच्या ऑफर्स स्विकारल्या. आमिर-शाहरुख-ऋतिकसोबतही तिने काम केले आहे.

२००८ हे वर्ष दयाासाठी थोड्याफार प्रमाणात चांगले ठरले. या वर्षात तिने ‘जोधा अकबर’, ‘सी के कंपनी’ आणि ‘लव स्टोरी 2050’ सारखे सिनेमात काम केले. इतकेच नाही तर सिनेमात साईड एक्टरची भूमिका साकारणारी दिशाला तारक मेहता मालिकेत मुख्य भूमिका मिळाली खऱ्या अर्थाने ते वर्ष तिच्यासाठी लकी ठरले. बघता -बघता  दिशा वकानी आज सर्वांची आवडती अभिनेत्री तर आहेच पण साऱ्यांची लाडकी दया बेन बनली.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी