Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shocking: Bigg Boss10 Winner Manveer Gurjar हा बॅचलर नसून आहे विवाहित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 12:19 IST

नोएडाचा रहिवाशी मनवीर गुर्जर आणि समाजहिताची कामे करण्याव्यतिरिक्त मनवीर हा एक दुग्ध व्यावसायिक इतकीच त्याची ओळख होती. मात्र बिग ...

नोएडाचा रहिवाशी मनवीर गुर्जर आणि समाजहिताची कामे करण्याव्यतिरिक्त मनवीर हा एक दुग्ध व्यावसायिक इतकीच त्याची ओळख होती. मात्र बिग बॉस 10 सिझनमध्ये या सामान्य माणसाने आपल्या टॅलेंट दाखवत बिग बॉस 10चा विजेता म्हणून नावारूपाला आला. काही महिन्यांपर्यंत फक्त एक समान्य माणूस अशी काय त्याची ओळकख होती.मात्र बिग बॉस या शोमुळे आज तो सेलिब्रेटी बनलाय. या घरात सपर्धक गुगल गर्ल नितीभा कोलसह त्यांचा रोमँटीक अंदाजही पाहायला मिळाला. त्यामुळे मनवीर आणि नितीभा यांच्यात अफेअर सुरू झाले. मात्र बिग बॉस 10चा  विजेता म्हणून ओळखला जाणारा मनवीरचे एक गुपित उघड झाले आहे. एका न्युज पोर्टलने दिलेल्या माहितीमुसार मनवीर हा बॅचलर नसून विवाहीत आहे.त्याला  5 वर्षाची मुलगी आहे.बिग बॉसच्या घरात दिसणारा साधा सरळ चेहरा आधीपासूनच 5 वर्षाच्या मुलीचा वडील असल्याचे या पोर्टलने म्हटले आहे. सोशलमीडियवर मनवीरच्या एका फोटोमुळे मनवीर विवाहीत असल्याचे उघड झाले असल्याचे कळतेय. हा फोटो त्याच्या लग्नाचा आहे. यामध्ये नवरदेवाच्या रुपात मनवीर घोडीवर बसलेला दिसतोय.Read More:बिग बॉस बनतोय बॉलीवूडमध्ये करिअर करण्याचा राजमार्गAlso Read: लहानपणी अशी दिसायची बानी जे,सोशलमीडियावर बहिणीने शेअर केले बानीचे Childhood Photoमनवीरने एन्ट्रीपासून ते फिनालेपर्यंत स्पर्धकांसोबत खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या.इतकेच नाही तर एकदा त्याला मुलीकडील मंडळी बघायला आली होती. मात्र ती मंडळी घरी येण्याच्याआधीच त्याने घरातून पळ काढल्याचे मनवीरने शोमध्ये सांगितले होते. मनवीरच्या अशा वागण्याने त्याचे वडील त्याच्यावर नाराजही झाले होते. याच कारणामुळे त्याने त्याचे घरही सोडून एकटा राहत असल्याचे या शोमध्ये म्हटले होते. बिग बॉसच्या फिनाले राऊंडमध्ये सलमान खआनने गौरव चोपडां हे घर बाहेर कसे दिसते आणि घरात तुला कसा अनुभव आला. तुला काय वाटते तू घरात कसे वागायला हवे होते?त्यावर गौरव चोपडाने दिलेले उत्तरही अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. त्यावळी गौरवने म्हटले होते की,या घरात आलेले स्पर्धक हे खूप फेक चेहरे घेवून फिरतायेत. आणि मी या घरात फेक नाही तर जसा मी आहे तसा प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला हीच माझी चुक ठरली आणि मी या घारतून नॉमिनेट झालो. मलाही या घरातल्या इतर फेक स्पर्धाकांप्रमाणे मुखवटा घेवून फिरलो असतो तर आज बिग बॉसच्या रनरअपमध्ये तरी माझे नाव राहिले असते. गौरव चोपडाच्या याच वक्तव्यानंतर अनेक स्पर्धकांची पोलखोल होत असल्याचे पाहायला मिळतंय. त्यामुळे आता मनवीर गुर्जरवर नितीभाने दाखवलेला विश्वासामुळे आता तिला कितने अजबी रिश्ते है यहाँ पे असेच म्हणण्याची वेळ आली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.