Join us
Daily Top 2Weekly Top 5

SHOCKING  : ‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकाने महिला स्पर्धकासोबत केले असे काही, होऊ शकते अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 14:05 IST

बिग बॉस मल्याळम 2 : वाचा काय आहे प्रकरण

ठळक मुद्दे या कृत्यामुळे रजीत प्रचंड ट्रोल होतोय.

बिग बॉस हिंदी’चे 13 वे सीझन नुकतेच संपले. पण ‘बिग बॉस मल्याळम’ मात्र अद्यापही सुरु आहे. होय, ‘बिग बॉस मल्याळम’चे हे दुसरे सीझन आहे. तूर्तास ‘बिग बॉस मल्याळम’मधील लोकप्रिय स्पर्धक रजीत कुमारमुळे हा शो वादात सापडला आहे. होय, बिग बॉसच्या घरात रजीत कुमारने असे काही केले की, तुम्ही आम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाही. होय, त्याच्या धक्कादायक कृत्यानंतर आता त्याला अटक होण्याची शक्यता आहे.‘बिग बॉस मल्याळम’च्या 66 व्या एपिसोडमध्ये एक टास्क रंगला होता. या टास्कमध्ये घरातील सर्व स्पर्धकांना स्टुडंट आणि टीचर अशा दोन गटात विभागण्यात आले होते. आर्या, दया, सुजो, फुकरू टीचर तर रजीत कुमार, रेशमा, अभिरामी, अमृता, शाजी आणि अलिना स्टुडंट बनले होते. टास्कनंतर प्रत्येकजण रेशमाचा वाढदिवस साजरा करत असतानाच रजीत कुठल्या कारणावरून भडकला. इतका की, मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याने हिरव्या मिरच्यांची पेस्ट रेशमाच्या डोळ्यांवर चोळली.

यानंतर रेशमा जोरजोरात किंचाळू लागली, रडू लागली. तिची अवस्था बघून तिला तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. या घटनेनंतर रजीतने बिग बॉसची माफी मागितली. पण शो मेकर्सनी कठोर कारवाई करत रजीतला शो बाहेर हाकलले.तूर्तास या कृत्यामुळे रजीत प्रचंड ट्रोल होतोय. आयबी टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रजीतचे हे कृत्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. यासाठी त्याला आयपीसीच्या कलम 324, 323 आणि 325 अंतर्गत अटकही होऊ शकते.

टॅग्स :बिग बॉस