Join us

Shocking : ​लठ्ठपणा कमी करण्यासाठी ‘या’ अभिनेत्याने गमविला जीव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2017 12:24 IST

वाढलेले वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटी काहीही उपाय करायला तयार असतात. मग त्यासाठी त्यांना कितीही त्रास झाला तरी चालेल. मात्र ...

वाढलेले वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटी काहीही उपाय करायला तयार असतात. मग त्यासाठी त्यांना कितीही त्रास झाला तरी चालेल. मात्र वजन कमी करण्याच्या या हट्टामुळे एका अभिनेत्याला चक्क आपला जीव गमवावा लागला आहे. विवेक शौक हे त्या अभिनेत्याचे नाव आहे, ज्याने लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपला जीव गमविला आहे. 'उल्टा-पुल्टा' आणि 'फ्लॉप शो' सारख्या टीव्ही शोमधून ओळख निर्माण करणारे विवेक शौक हे बॉलिवूडमध्ये सपोर्टींग रोल करायचे. ३ जानेवारी २०११ ला विवेक लठ्ठपणा कमी करण्यासाठी आॅपरेशन (लिपोसक्शन सर्जरी) करण्यासाठी ठाण्यातील कारखानिस नर्सिंग होममध्ये गेले होते. प्लास्टीक सर्जन डॉ. समीर कारखानीस यांनी त्यांची सर्जरी केली होती. सर्जरीच्या दोन तासांनंतर विवेक यांची प्रकृती खालावली. त्यानंतर तीन हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विवेक यांचे हृदय बंद पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यांना इमर्जन्सी शॉक देण्यात आले. त्यानंतर व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते, पण ते कोमात गेले. आणि सात दिवसांनी म्हणजे १० जानेवारी २०११ ला त्यांचे निधन झाले होते.लिपोसक्शन सर्जरीसाठी व्यक्तीने पूर्णपणे फिट असणे गरजेचे असते. पण डॉ. समीर कारखानिस यांच्या मते विवेक यांनी त्यांची मेडिकल हिस्ट्री लपवली होती. सर्जरीपूर्वी त्यांचे ‘इसीजी’ आणि ‘२डी इको’ करण्यात आले होते त्यावेळी तेही नॉर्मल आले होते. त्यामुळे डॉक्टरांना सर्जरी करण्यात काहीही अडचण आली नाही. २००३ मध्ये विवेक यांना एक मोठा हार्ट अटॅक आला होता. ज्युपिटर हॉस्पिटलचे कार्डियोलॉजिस्ट डॉ. विजय शाह यांनी त्यावेळी म्हटले होते की, शौक यांच्या मेडिकल हिस्ट्रीवरून आम्हाला समजले की त्यांना २००३ मध्ये स्टेंट्स लावण्यात आले होते. ते रक्त पातळ होण्याची औषधे घेत होते. पण लिपोसक्शन सर्जरीपूर्वी त्यांनी ते बंद केले होते.