शोएब अख्तर बनणार जज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 13:38 IST
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर छोट्या पडद्यावर आगमन करत आहे. शोएब इंडियन मजाक लिग या क़ॉमेडी शोमध्ये झळकणार आहे. या ...
शोएब अख्तर बनणार जज
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर छोट्या पडद्यावर आगमन करत आहे. शोएब इंडियन मजाक लिग या क़ॉमेडी शोमध्ये झळकणार आहे. या कार्यक्रमात तो परीक्षकाची भूमिका साकारणार आहे. क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू द कपिल शर्मा शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यानंतर आता शोएब छोट्या पडद्यावर काम करणार आहे. शोएब त्याच्या या नव्या इनिंगसाठी खूपच उत्सुक आहे.