Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवानी बदोनीचे छोट्या पडद्यावर पदार्पण, दिसणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 07:15 IST

शिवानी बदोनी सोनी सब वाहिनीवरील बावले उतावले मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.

ठळक मुद्दे शिवानी बदोनी'बावले उतावले' मालिकेतून छोट्या पडद्यावर करतेय पदार्पण

 शिवानी बदोनी सोनी सब वाहिनीवरील 'बावले उतावले' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ही माझ्यासाठी फार मोठी संधी आहे आणि त्यामुळे मी फार आनंदी असल्याचे शिवानी सांगते.

बावले उतावले मालिेकेत फंटी आणि गुड्डू या दोघांच्या भन्नाट कुटुंबांची कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेबाबत शिवानीने सांगितले, दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांवर आणि आपापल्या जोडीदारांवर फार प्रेम करतात. गुड्डू आणि फंटी सध्या जोडीदाराच्या शोधात आहेत. भाईसाहेब यांचे नुकतेच लग्न झाले आहे. त्यामुळे, त्यांना प्रेरणा मानणाऱ्या गुड्डूलाही लग्न करायचं आहे. तर, फंटी ही अगदी साधी मुलगी आहे. आपल्याला परफेक्ट नवरा मिळावा, अशी प्रार्थना ती नेहमी देवाकडे करत असते.या मालिकेत शिवानीने कुसूम ऊर्फ फंटीची भूमिका साकारली असून तिने या व्यक्तिरेखेबद्दल सांगितले की, फंटी ही फार गोड आणि साधी मुलगी आहे. ती काहीशी लाजरीही आहे. मात्र, गरज भासल्यास ती फार स्मार्टही असते. दिवसातला बराच वेळ ती परफेक्ट वर मिळण्याची स्वप्ने पाहत असते. चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल तिने सांगितले की, वर्कशॉपच्या अगदी पहिल्याच दिवशी मी, पारस अरोरा (गुड्डू), वैभव सिंग (भाईसाहब) आणि मोहिता श्रीवास्तव (सोनू भाभी) चटकन एकमेकांसोबत जोडले गेले. चित्रीकरणातही आम्ही फार धमाल करतो. या मालिकेची संकल्पनाच इतकी विनोदी आहे की, ब्रेकमध्ये फारच धमाल सुरू असते. काही वेळा तर मला ओरडाही मिळाला आहे. पण, यातून बरेच काही शिकता येते. 

टॅग्स :सोनी सब