Join us

"सुरुवात गोड तर सगळंच गोड म्हणून...", शिवानी सोनारने सुबोध भावेला दिली छोटीशी भेटवस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:25 IST

Tu Bhetashi Navyane : सोनी मराठी वाहिनीवरील आगामी मालिका 'तू भेटशी नव्याने'ची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिका कधीपासून भेटीला येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये रंगली आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात झाली आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील आगामी मालिका 'तू भेटशी नव्याने'(Tu Bhetashi Navyane)ची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिका कधीपासून भेटीला येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये रंगली आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात झाली आहे. या मालिकेत सुबोध भावे (Subodh Bhave) आणि शिवानी सोनार (Shivani Sonar) यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दरम्यान आता शिवानी सोनार हिने सुबोध भावेला मालिकेच्या निमित्ताने छोटीशी भेटवस्तू दिली आहे.

शिवानी सोनारने सुबोध भावेला भेटवस्तू देतानाचा फोटो शेअर करत लिहिले की, सुरुवात गोड तर सगळंच गोड म्हणून माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट. सुबोध सरांची मला आवडलेली आत्तापर्यंतची कामे आणि आता ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या निमित्ताने मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे ही छोटीशी भेटवस्तू. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

अभिनेता सुबोध भावे हा यापूर्वी निरनिराळे गाजलेले चित्रपट, विविध मालिका यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने साकारलेल्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्या आहेत. शिवानी सोनार हिच्या यापूर्वीच्या व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले आहे. आताही  या नव्या व्यक्तिरेखेतील मालिकेवर प्रेक्षक विशेष प्रेम करतील याबाबत शंका नाही. मालिकाविश्वात ए आयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. २५ वर्षांपूर्वीचा सुबोध आणि आत्ताचा सुबोध अशा व्यक्तिरेखा दिसणार आहेत आणि ही एक प्रेमकथाही आहे यांमुळे ही मालिका प्रेक्षकांना विशेष आवडेल यात शंका नाही. तर पाहायला विसरू नका, ‘तू भेटशी नव्याने’! ही मालिका लवकरच सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :सुबोध भावे