Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आपली पहिली भेट झाली तेव्हाच मी.." शिवानी रांगोळीने ऑनस्क्रिन सासूबाईंसाठी लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 13:00 IST

कविता मेढेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ऑनस्क्रिन सूनबाईंनी खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री कविता मेढेकर या मालिका, चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. कविता मेढेकर या पूर्वाश्रमीच्या कविता लाड. लहानपणी कुठल्याही नाटकात, एकांकिकेत न झळकलेल्या कविता लाड यांनी पेपरमधील जाहिरात वाचून पैलतीर या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. बालकलाकार म्हणून या मालिकेत झळकण्याची त्यांना नामी संधी मिळाली होती. . सध्या त्या झी वाहिनीवरील तुला शिकवीण चांगलाच धडा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

'तुला शिकवीण चांगलाच धडा' मालिकेत भुवनेश्वर पात्र साकारणाऱ्या कविता मेढेकर यांचा आज वाढदिवस आहे. कविता मेढेकर  यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ऑनस्क्रिन सूनबाईंनी खास पोस्ट शेअर केली आहे. शिवानीने कविता मेढेकर यांच्यासोबतचा सेटवरील फोटो शेअर केला आहे. शिवानी या मालिकेत अक्षराची भूमिका साकारते आहे. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

शिवानीने कविता मेढेकर यांच्या सोबतचा फोटो शेअर करत तिने लिहिले, हॅप्पी बर्थ डे ताई, माझ्या लग्नात आपली पहिली भेट झाली तेव्हाच मी तुला सांगून टाकलं की मी तुझी फॅन आहे! आणि आता तुझ्या बरोबर काम करून मला खूप आनंद होतो की तुझ्याकडून खूप काही शिकण्याची संधी मला मिळते आहे. तू पहिल्या दिवसापासून माझी मैत्रीण आहेस. आपले ' गप्पांचे कट्टे ' माझे most favourite आहेत! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आय लव्ह यू..

टॅग्स :कविता लाडशिवानी रांगोळे