Marathi Tv Serial: मराठी टेलिव्हिजन विश्वात आगामी काळात विविध मालिका सुरू होणार आहेत. यापैकी काही मालिकांचे प्रोमोही समोर आले आहेत. वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर आनंदी ही नवीकोरी मालिका प्रसारित केली जाणार आहे. येत्या ३० मार्चपासून, दररोज रात्री ९.३० वाजता, स्टार प्रवाहवर सुरू होतेय.त्यामुळेच ही नवी मालिका सुरू झाल्यावर 'स्टार प्रवाह'ची कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असा प्रश्न मालिका रसिकांना पडला होता. अखेर त्या मालिकेचं नाव समोर आलं आहे.
दरम्यान, अशी एक प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत स्टार प्रवाह वाहिनीने अनेक मालिकांचे टाइम्स स्लॉट बदलले. त्यात अनुष्का सरकटेची मुख्य भूमिका असलेल्या वचन दिले तू मला या मालिकेची वेळ बदलण्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर मी सावित्रीबाई जोतिराव फुले या मालिकेची वेळ देखील बदलली गेली. त्यामुळे साधी माणसं मालिकेचं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेरीस २ वर्ष अवितरपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही लोकप्रिय मालिका संपणार आहे. दरम्यान, अद्याप याबाबत वाहिनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
नुकताच साधी माणसं मालिकेचा शेवटचा सीन शूट करण्यात आला. ज्यामुळे मालिकेतील कलाकार देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. 'साधी माणसं ' ही मालिका २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. मीरा आणि डॅशिंग सत्या यांची अनोखी लव्हस्टोरी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या मालिकेत शिवानी बावकर,आकाश नलावडे तसेच सुप्रिया पाठारे, प्रशांत चौडप्पा, प्रतिभा गायकवाड ,पंकज खामकर,पंढरीनाथ कांबळे असे कलाकारा पाहायला मिळाले. ही मालिका बंद होणार असल्याचं कळताच प्रेक्षक देखील प्रचंड नाराज झाले आहेत.
Web Summary : The popular Marathi TV serial 'Sadhi Manase,' loved for its unique love story, is ending after two years. The last scene has been shot, leaving the cast and fans emotional. A new series will soon replace it.
Web Summary : लोकप्रिय मराठी टीवी सीरियल 'साधी माणसे', अपनी अनोखी प्रेम कहानी के लिए जाना जाता है, दो साल बाद बंद हो रहा है। आखिरी सीन शूट हो चुका है, जिससे कलाकार और प्रशंसक भावुक हैं। जल्द ही एक नई श्रृंखला इसे प्रतिस्थापित करेगी।