Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशियातील सेक्सिएस्ट वुमनमध्ये शिवांगी जोशीने पटकावले हे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 18:51 IST

‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ या लोकप्रिय मालिकेत नायराची भूमिका रंगविणारी अभिनेत्री शिवांगी जोशी ही व्यावसायिक आणि वैयक्तिक स्तरावर भलतीच यशस्वी ठरत आहे.

स्टार प्लसवरील ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ या लोकप्रिय मालिकेत नायराची भूमिका रंगविणारी अभिनेत्री शिवांगी जोशी ही व्यावसायिक आणि वैयक्तिक स्तरावर भलतीच यशस्वी ठरत आहे. या रूपसुंदर अभिनेत्रीने अलीकडेच २०१८ मधील आशियातील ५० सर्वाधिक मादक महिलांच्या यादीत चक्क पाचवे स्थान पटकाविले आहे. पाचव्या स्थानावर आपले नाव कोरताना या अभिनेत्रीने चक्क बॉलिवूडच्या आलिया भट आणि सोनम कपूर यासारख्या तारकांनाही मागे टाकले आहे.या मालिकेत तिचा पती कार्तिकची भूमिका साकारणारा अभिनेता मोहसिन खान याने तात्काळ आपल्या सोशल मीडियावरून हे वृत्त प्रसारित करीत तिचे अभिनंदन केले. या मालिकेतील या दोघांमधील भावपूर्ण नात्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत नायरा आणि कार्तिक यांच्या जीवनात आता नव्या टप्प्याचा प्रारंभ होत आहे; कारण नायरा लवकरच आई बनणार आहे. स्टार प्लसवरील ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ या लोकप्रिय मालिकेतील कार्तिक आणि नायरा या दाम्पत्याने अनेक प्रेमी युगुलांपुढे आदर्श दाम्पत्याचा वस्तुपाठ ठेवला असून प्रेक्षक आणि त्यांचे चाहते यांच्यात त्यांच्या जीवनातीलपालकत्वाच्या नव्या टप्प्यास ते कसा प्रारंभ करतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.पती-पत्नी असलेल्या कार्तिक आणि नायरा यांनी आता आपल्या नात्याला एका नव्या उंचीवर नेण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच पालक होणार आहेत. त्यांच्या चाहत्यांना आता नायरा प्रथमच गर्भवती राहिल्यानंतर या दोघांमधील नात्याचा एक नवा आणि अधिक अवघड पैलू पाहण्याची संधी मिळणार आहे. कार्तिक आणि नायरा आता त्यांच्या जीवनातील एका नव्या, हव्याहव्याशा टप्प्यात प्रवेश करणार असून त्यामुळे या दोघांच्या मनात आपल्यातील भावी नात्याबद्दल एक हुरहुर आणि साशंकता निर्माण झाली आहे. आपण आता पालक झाल्यावर आपल्यातील नातेसंबंध कसे राहतील आणि ते कशा प्रकारचे पालक बनतील, अशा प्रश्नांनी त्यांच्या मनात रुंजी घालण्यास प्रारंभ केला आहे. नात्याचा हा नवा टप्पा त्यांच्यातील अनुरूपतेची आणि त्यांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाची कसोटी ठरणार आहे. या दाम्पत्याचा हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी सारे कुटुंबीय एकत्र येणार आहेत.

टॅग्स :स्टार प्लस