Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जीव झाला येडापिसा'मध्ये अखेर शुध्दीवर येणार शिवादादा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 06:30 IST

संपूर्ण रुद्रायत ज्या सुरमारीच्या स्पर्धेची आतुरतेने वाट पहात होते ती स्पर्धा अवघ्या गावासाठी, सिध्दीसाठी आणि लष्करे कुटुंबासाठी काळादिवस ठरली.

संपूर्ण रुद्रायत ज्या सुरमारीच्या स्पर्धेची आतुरतेने वाट पहात होते ती स्पर्धा अवघ्या गावासाठी, सिध्दीसाठी आणि लष्करे कुटुंबासाठी काळादिवस ठरली. सुरमारीचा दिवस आयुष्यभर सगळ्यांच्या लक्षात राहील... या सुरमारीच्या स्पर्धेमध्ये शिवावर जीवघेणा हल्ला झाला, आणि अजूनही शिवा त्यामधून बाहेर पडलेला नाही... सगळे तो पुन्हा शुध्दीवर येण्याची वाट बघत आहेत... पण, हे सगळ होत असताना अपराधी असल्याची भावना सिध्दीची पाठ सोडत नाहीये... कारण हे सगळे शिवाबद्दल सिध्दीच्या मनात असलेल्या तिरस्काराच्या भावनेमधूनच सुरू झाले... तिने भरवलेल्या पेढ्यामुळेच शिवा प्रतिकार करू शकला नाही हे तिला कळून चुकले. मात्र या घटनेमुळे खरा शिवा कसा आहे हे हळूहळू सिध्दीच्या समोर येत आहे... मग ते सोनीद्वारे असो वा सौम्यामुळे... सोनीने सिध्दीला हे खूप आधीच सांगितले की, शिवादादाला माहिती होते की त्याच्या बरोबर सुरमारीच्या स्पर्धेमध्ये उतरलेला माणूस मारेकरी होता. यानंतर सगळ्यात मोठे सत्य सौम्याने सिध्दीसमोर आणलं आहे. ज्या घटनेमुळे सिद्धीच्या मनात शिवाबद्दल गैरसमजाची भावना रुजू झाली ते सत्य सांगितल्यानंतर सिध्दीच्या मनामध्ये शिवाबद्दलचा गैरसमज आणि राग आता कमी होऊन सिध्दीला तिने केलेल्या कृतीबद्दल पश्चाताप होऊ लागला आहे... आणि यासाठीच ती शिवाची माफी मागते आणि याच दिवशी बर्‍याच दिवसानंतर शिवा कोमामधून बाहेर येतो... शिवावरचा धोका आता टळला आहे आणि तो आता सुखरूप आहे ही बातमी कळताच सगळ्यांना आनंद होतो आणि शिवाच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव इस्पितळाच्या बाहेर जमत आणि त्याची मिरवणूक काढली जाते.

सिध्दी आणि शिवाचा आता नवा आनंदमयी प्रवास सुरू होणार आहे, या प्रवासामध्ये सिध्दीला शिवाची साथ मिळेल ? सिद्धीची बाजू शिवा समजून घेईल ? शिवाला सत्य कळल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल ? 

टॅग्स :कलर्स मराठी