प्रत्येक नात्यामध्ये विश्वास खूप महत्वाचा असतो... असे म्हणतात नात्यामध्ये विश्वास आणि प्रेम असेल तर कुठल्याही संकटाला सामोरी जाण्याचे बळ येते. पण लग्ना आधीपासुनच शिवा आणि सिद्धीचे एकमेकांशी कधीच पटले नाही. मग त्यामागे शिवाची वागणूक असो, त्याचे विचार असो वा त्याचा आत्याबाईंना असलेला पाठिंबा असो... तर शिवाला देखील सिद्धी एक क्षण देखील समोर सहन होत नाही... पण हळूहळू मात्र या दोघांचे नाते बदलू लागले. शिवाचे कधी सिद्धीला कधी तिच्या घरच्यांना मदत करणे, तिची काळजी घेणे, सिद्धीसाठी शिवाचे आईच्या विरोधात जाणे या सगळ्या गोष्टींमुळे सिद्धीला कुठेतरी आता शिवाबद्दल आपुलकी, प्रेम वाटु लागले आहे... पण शिवाच्या मनामध्ये नक्की काय आहे ? त्यालासुध्दा सिद्धीबद्दल आपुलकी वाटते आहे का ? हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.
शिवा – सिध्दीच्या नात्याची होणार नवी सुरुवात ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 15:24 IST