Join us

'शिवा' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा, मुलगी झाल्याने आनंदाला उधाण

By देवेंद्र जाधव | Updated: August 8, 2025 13:47 IST

'शिवा' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याला मुलगी झाली असून लेकीचा बाप झाल्याने या अभिनेत्याने आनंद साजरा केलाय.

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका म्हणजे 'शिवा'. या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता बाबा झाला असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे. या अभिनेत्याचं नाव आहे सुनिल तांबट. सुनिल आणि त्याची पत्नी प्रतिमा दातार यांनी एकत्रच ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली आहे. सुनिलाने ही आनंदाची बातमी शेअर करताच त्याच्या चाहत्यांनी आणि मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी त्याचं अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

सुनिल तांबट झाला बाबा

सुनिल तांबटने सोशल मीडियावर पत्नीचा गरोदरपणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली त्याने लेकीची पहिली झलक दाखवली असून बाळाचे पाय दिसत येत आहेत. या फोटोवर सुनिलने कॅप्शन दिलंय, 'आमचा बॉक्स अखेर उलगडला. आम्हाला मुलगी झाली'. याशिवाय 'खऱ्या आयुष्यातील आमच्या भूमिका बदलल्या आहेत. एका मुलीचे आई-बाबा झाल्याने आम्ही खूप आनंदी आणि अभिमानी आहोत', अशा शब्दात सुनिल आणि प्रतिमा या पती-पत्नीने मुलगी झाल्याचा आनंद साजरा केलाय. 

सुनिल तांबट हा गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. सुनिलने स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठीवरील मालिकांमध्ये अभिनय केला. सुनिलने मराठी मालिकांमध्ये छोट्या तरीही प्रभावी भूमिका साकारल्या. अलीकडेच सुनिलने 'शिवा' मालिकेत साकारलेली भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली. सुनिलची पत्नी प्रतिमा एक डान्सर असून त्यांच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत असतात. सुनिल आणि प्रतिमाचं 'शिवा' मालिकेतील कलाकारांनी अभिनंदन केलंय.

टॅग्स :प्रेग्नंसीगर्भवती महिलाझी मराठीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन