Join us

'शिवा'ने घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री पूर्वा कौशिकच्या डोळ्यांत तरळल्या आठवणी! म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:55 IST

'शिवा' मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप ! पूर्वा कौशिक पोस्ट शेअर करत म्हणाली- "या प्रवासाने इतकं काही दिलंय, की..."

Purva Kaushik Post: मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये टेलिव्हिनज हे माध्यम प्रेक्षकांच्या अगदी जवळचं आहे. या मालिका प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालल्या आहेत. अशीच एक छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणारी मालिका जिने जवळपास दीड वर्ष रसिकांचं मनोरंजन केलं, मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच नाव 'शिवा' आहे. हटके कथानक आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने या मालिकेला चांगलीच पसंती मिळाली. मालिकेतील शिवा आणि आशूची केमिस्ट्री अनेकांना भावली. लवकरच ही मालिका ऑफ एअर होणार आहे. त्यामुळे मालिकेतील मुख्य अभिनेत्री पूर्वा कौशिकने भावुक पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

पूर्वा कौशिकने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने शिवा मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिलंय, "शिवा नावाच्या या प्रवासाने मला इतकं काही दिलंय, की एका पोस्टमध्ये सगळं मांडणं शक्यच नाही! खरंतर कालच ही पोस्ट टाकायची होती.. की technical error आज takte... तुम्हा सगळ्या माझ्या सहकलाकारांसोबतच्या या आठवणी, मस्ती, आणि त्या छोट्या-छोट्या गप्पा... हे सगळं माझ्यासाठी अनमोल आहे!"

यापुढे पूर्वाने लिहिलंय, "तुमच्या सोबतीने हा सेट जणू माझं दुसरं घरच बनलंय! खूप खूप आभार, माझ्या या लाडक्या टिमला, जी मला रोज नवीन कारणं देते हसण्यासाठी, जगण्यासाठी ,चिडण्यासाठी, सगळ्यासाठी...! Thank you for supporting ....", अशी भावुक करणारी पोस्ट लिहून अभिनेत्रीने चाहत्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, 'शिवा' मालिका १२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर यांची मालिकेत प्रमुख भूमिका होती.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी