Join us

शिव ठाकरेची कुटुंबासह 'दुबई' सफर, शेअर केला सुंदर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:54 IST

शिव ठाकरेनं सोशल मीडियावर दुबई ट्रिपचा व्हिडीओ शेअर केला.

मराठी बिग बॉस विजेता आणि 'खतरों के खिलाडी' फेम अभिनेता शिव ठाकरे हा कायमच चर्चेत असतो. शिव ठाकरेची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शिव ठाकरे सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. अशातच शिव ठाकरेनं सोशल मीडियावर दुबई ट्रिपचा व्हिडीओ शेअर केला.  शिव ठाकरे सध्या आपल्या कुटुंबासोबत खास वेळ घालवत आहे.

शिवने आपल्या दुबई ट्रिपचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आपल्या आई आणि आई-वडिलांसोबत दुबईतील विविध ठिकाणी फिरताना आणि आनंदी क्षण घालवताना दिसलाय. शिवने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "फक्त त्यांची प्रत्येक जिद्द पूर्ण करायची आहे". दुबईत फिरताना त्याच्या आईने सहावारी तर आजीने नऊवारी साडी परिधान केल्याचं दिसलं. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून भरभरुन प्रेमाचा वर्षाव झालाय.

शिव ठाकरे नेहमीच आपली आजी, आई आणि कुटुंबावरील प्रेम व्यक्त करत असतो. मुळचा अमरावतीचा असलेला शिव हा प्रसिद्धीच्या शिखरावर असताना मातीशी नाळ जोडून आहे. यामुळे चाहते त्याचं विशेष कौतुक करतात. शिवने बिग बॉसनंतर अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला. बिग बॉस हिंदी मध्येही तो झळकला. तिथे तो रनर अप होता.'खतरो के खिलाडी','रोडीज' मध्येही तो होता. बिग बॉस मराठीमध्ये असताना त्याचं वीणा जगतापसोबत अफेअर गाजलं. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. मधल्या काळात त्याचं डेजी शाहसोबत नाव जोडलं गेलं होतं.

टॅग्स :शीव ठाकरेदुबई