Join us

बाबो..! शिल्पा तुळसकरचा वयानं लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर रोमान्स; ट्रेलरमध्ये दिसली इंटिमेट सीनची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 19:37 IST

Shilpa Tulaskar: शिल्पा तुळसकरचा नुकताच तू तेव्हा तशी मालिकेतील रोमान्स सीन्स खूप चर्चेत आला होता. त्यानंतर आता वेब सीरिजमध्ये रोमान्स करताना दिसणार आहे.

अभिनेत्री शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) सध्या तू तेव्हा तशी मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत ती मुख्य व्यक्तिरेखा साकारत असून अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आहे. शिल्पाने या मालिकेत स्वप्नीलबरोबर इंटिमेट सीन दिले होते. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर आता ती पुन्हा इंटिमेट सीनमुळे चर्चेत आली आहे.

तू तेव्हा तशी मालिकेत बोल्ड सीन दिल्यानंतर आता शिल्पा वेब सीरिजमध्ये रोमान्स करताना दिसणार आहे. ‘हसरत’ असं वेब सीरिजचं नाव आहे आणि याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन या वेब सीरिजचा ट्रेलर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून शिल्पाने दिलेल्या बोल्ड सीनची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

शिल्पा तुळसकर या सीरिजमध्ये वयाने लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये सीरिजमधील तिच्या इंटिमेट सीनची झलक पाहायला मिळाली आहे. १२ डिसेंबरपासून ‘हंगामा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज रिलीज होणार आहे.शिल्पा तुळसकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. तिने मराठी चित्रपट आणि मालिकेत काम करुन रसिकांच्या मनावर अभिनयाची छाप उमटविली आहे. सध्या ती तू तेव्हा तशी मालिकेतील अनामिकाच्या भूमिकेतून घराघरात पोहचली आहे.