शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू यांची तिकडी सुपर डान्सर 2 मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 12:56 IST
सुपर डान्सर या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाची चांगलीच चर्चा झाली होती. या कार्यक्रमातील स्पर्धक आणि त्यांच्या गुरुंच्या आगळ्या वेगळ्या नृत्यामुळे ...
शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू यांची तिकडी सुपर डान्सर 2 मध्ये
सुपर डान्सर या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाची चांगलीच चर्चा झाली होती. या कार्यक्रमातील स्पर्धक आणि त्यांच्या गुरुंच्या आगळ्या वेगळ्या नृत्यामुळे जगभरात त्यांची वाहवा केली गेली होती. या डान्स रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या यशानंतर आता या कार्यक्रमाचे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वातदेखील अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, नृत्यदिग्दर्शक गीता कपूर आणि निर्माता-दिग्दर्शक अनुराग बासू परीक्षकाची भूमिका बजावणार आहेत. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचे परीक्षण करण्यासाठी सध्या हे तिघेही खूप उत्सुक आहेत. याविषयी शिल्पा शेट्टी कुंद्रा सांगते, परीक्षक म्हणून परतण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे आणि विशेष म्हणजे अनुराग आणि गीता या माझ्या जुन्या मित्रांसोबत मला पुन्हा काम करायला मिळणार असल्याचा मला खूप आनंद होत आहे. सुपर डान्सरमध्ये नेहमीच एकापेक्षा एक सरस डान्सर पाहायला मिळाले आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान असतो. या कार्यक्रमात येणारे सगळेच स्पर्धक अतिशय प्रतिभाशाली आणि उत्साही असतात. त्यामुळे या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची मी आतुरतेने वाट पाहात आहे तर नृत्यदिग्दर्शिका गीता कपूर सांगते, गेल्या पर्वात आम्हाला खूपच चांगले स्पर्धक पाहायला मिळाले होते. यंदाच्या पर्वात या कार्यक्रमाचा स्तर आणखी उंचावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही या कार्यक्रमाद्वारे देशभरातील चांगल्या डान्सरचा शोध घेणार आहोत. शिल्पा आणि अनुराग सोबत चित्रीकरण करायला खूपच मजा आली होती. या पर्वादेखील आम्ही तितकीच मजा-मस्ती करणार आहोत. सुपर डान्सरचे ऑडिशन्स लवकरच सुरू होणार असून देशभरातील 15 शहरांमध्ये हे ऑडिशन्स घेतले जाणार आहेत. Also Read : पाहा, ‘बर्थ डे गर्ल’ शिल्पा शेट्टीची काही गाजलेली गाणी!