Join us

सुपर डान्सरच्या सेटवर शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि इरफान खान या गोष्टीमुळे झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 17:02 IST

सुपर डान्सर या कार्यक्रमाचा सध्या दुसरा सिझन सुरू असून या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक खूप चांगले परफॉर्मन्स सादर करत परीक्षकांची ...

सुपर डान्सर या कार्यक्रमाचा सध्या दुसरा सिझन सुरू असून या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक खूप चांगले परफॉर्मन्स सादर करत परीक्षकांची वाहवा मिळवत आहेत. या कार्यक्रमाच्या स्पर्धकांच्या नृत्यावर तर प्रेक्षक फिदा झाले आहेत. या सगळ्यांचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. ही मुले वयाने लहान असली तरी त्यांना चांगलीच समज आहे. काहींची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांना नाव कमावून आपल्या घराची जबाबदारी सांभाळाची आहे. या कार्यक्रमातील आकाश थापा हा स्पर्धक अतिशय खोडकर स्वभावाचा आहे आणि त्यामुळे त्याला सगळेच प्रेमाने ‘खट्याळ थापा’ अशी हाक मारतात. त्याची बहीण त्याची सगळ्यात लाडकी व्यक्ती असून तिला त्रास देण्याची एकही संधी आकाश कधी सोडत नाही. त्याच्या बहिणीसोबत त्याचे एक स्पेशल नाते आहे. आकाश खूपच खोडकर असल्याने तो सगळ्यांचाच खूप लाडका आहे. तो घरात तर नेहमीच सगळ्यांसोबत मस्करी करत असतो. पण त्याच्या या खट्याळ स्वभावामागे एक खास कारण दडले आहे. त्याने हे कारण नुकतेच सुपर डान्सर या कार्यक्रमाच्या सेटवर सगळ्यांना सांगितले. हे कारण ऐकून सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. त्याने सांगितले की, आकाशची बहीण वर्षा थापाचा साखरपुडा झाल्यानंतर अवघ्या १७ दिवसांत तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे निधन झाले. या घटनेमुळे ती इतकी उद्ध्वस्त झाली होती की तिने स्वतःला घरात कोंडून घेतले होते आणि ती एकाकी राहू लागली होती. लोक तिच्या होणार्‍या नवर्‍याच्या मृत्यूसाठी तिलाच जबाबदार ठरवू लागले होते. तिचे मन त्या दुर्दैवी घटनेपासून वळवण्यासाठी आणि तिला हसवण्यासाठी आकाश सतत तिच्यासोबत मजा-मस्करी करत असतो.सुपर डान्सर या मालिकेचे परीक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांना धक्काच बसला आणि इतक्या कोवळ्या वयात आकाश थापाने दाखवलेल्या परिपक्वतेने ते हेलावून गेले. या कार्यक्रमात पाहुणा म्हणून आलेल्या इरफान खानने वर्षाला एक मोलाचा सल्ला दिला. तो म्हणाला, लोक बोलतात, ते त्यांचे कामच असते. पण त्यापेक्षा तुझे आयुष्य खूप अमूल्य आहे आणि ते तुलाच जगायचे आहे; लोकांच्या अपेक्षेनुसार ते जगू नकोस. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर...Also Read : सुपर डान्सर २ च्या सेटवर साजरा करण्यात आला रित्विक धनजाणीचा वाढदिवस