Join us

शिल्पा शिंदेला दिल्लीतील एका हॉटेलमध्ये भेटायला पोहोचला ‘हा’ व्यक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 21:59 IST

कलर्स टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि तेवढाच वादग्रस्त ‘बिग बॉस’ या शोच्या सीजन ११ ची चर्चा अजूनही रंगत आहे. या ...

कलर्स टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि तेवढाच वादग्रस्त ‘बिग बॉस’ या शोच्या सीजन ११ ची चर्चा अजूनही रंगत आहे. या शोची विजेती शिल्पा शिंदे सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहत आहे. आता पुन्हा एकदा शिल्पा माध्यमांमधील ठळक बातम्यांमध्ये झळकत असून, त्याचे कारण आता लव त्यागी ठरला आहे. होय, बिग बॉसच्या या एक्स कंटेस्टेंटने काही दिवसांपूर्वीच शिल्पा शिंदेची दिल्ली येथे एका हॉटेलमध्ये भेट घेतली आहे. शोदरम्यान शिल्पा आणि लव खूप चांगले मित्र नव्हते. मात्र शिल्पा प्रियांकच्या तुलनेत लवला खूप हॅण्डसम आणि इमोशनल व्यक्ती समजायची. तसेच लवदेखील शोदरम्यान नेहमीच शिल्पाचा आदर करताना दिसला. या उलट लवची हिना खानसोबत चांगली ट्यूनिंग होती. मात्र घराबाहेर पडताच या दोघांनी वेगवेगळ्या रस्त्यांनी जाणे पसंत केले. नुकतेच पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत हिनाने असे म्हटले होते की, तिला लव त्यागीच्या एक कानाखाली मारावीशी वाटते. हिंनाच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. दरम्यान, बिग बॉसच्या घरात लव, हिना आणि प्रियांकमधील मैत्रीची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र शो संपताच त्यांच्यातील ही मैत्री संपुष्टात आली. हिनाच्या मते, शो संपल्यानंतर तिघांनीही एकमेकांची भेट घेतली. लव त्यागीला फोन केल्याचेही तिने म्हटले. मात्र लवने त्याच्या उत्तरात मला एका कॉमनरप्रमाणे राहायची इच्छा असल्याचे म्हटले होते. पुढे बोलताना हिनाने हेदेखील म्हटले होते की, मी लव त्यागीवर खूप नाराज आहे. मला त्याच्या कानशीलात मारावीशी वाटत आहे, असेही तिने म्हटले होते.