Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शिकारी' फेम नेहा खान लवकरच दिसणार या मालिकेत, व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 13:58 IST

Neha Khan will be seen in Serial : नेहा खान पहिल्यांदाच मालिकेत काम करताना दिसणार आहे.

नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती. आता नेहा लवकरच मालिकेत दिसणार आहे. ती पहिल्यांदाच मालिकेत काम करताना दिसणार आहे. आता तिच्या या मालिकेतील तिचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. त्यात तिची झलक पहायला मिळत आहे. 

नेहा खान झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नेहाने इंस्टाग्रामवर या मालिकेतील तिचा प्रोमो शेअर केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, गावात नवीन पाखरू आलंय जणू....#DevManus #ZeeMarathi

या व्हिडीओत ती गाडीतून डॅशिंग अंदाजात उतरताना दिसते आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. नेहा खानचे चाहते तिला मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नेहा खान शिकारी चित्रपटानंतर 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमधल्या त्याच्या कामाचे खूप कौतूक झाले. तसेच झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन शोमध्ये ती सहभागी झाली होती. त्यात तिने आपल्या नृत्याची झलक दाखवली होती.

नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केलं आहे. याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती.

टॅग्स :नेहा खान