Join us
Daily Top 2Weekly Top 5

कवचची पाकिस्तानमध्येही धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 15:25 IST

कवच... काली शक्तियों से ही मालिका सध्या प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये पहिल्या आठवड्यापासूनच अव्वल आहे. ...

कवच... काली शक्तियों से ही मालिका सध्या प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये पहिल्या आठवड्यापासूनच अव्वल आहे. ही केवळ भारतीयांची आवडती मालिका नाहीये तर पाकिस्तानमधील लोकही ही मालिका आवडून पाहातात. या मालिकेत मंजुलिकाची भूमिका साकारणारी सारा खान नुकतीच पाकिस्तानला गेली होती. तिथे गेल्यावर या मालिकेचे अनेक चाहते तिला भेटले असल्याचे तिने सांगितले. या मालिकेला पाकिस्तानी प्रेक्षकांनीही दिलेल्या प्रेमासाठी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या विवेक दहियाने सोशल मीडियावरून चाहत्यांचे आभार मानले आहेत.