Join us

शर्लिन चोप्रा दिसणार 'या' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 06:00 IST

आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शर्लिन चोप्रा लवकरच ‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेत एक भूमिका रंगविणार आहे.

ठळक मुद्देशर्लिन चोप्रा ग्लॅमरस अवतारात छोट्या पडद्यावर दिसणार आहे

आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शर्लिन चोप्रा लवकरच ‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेत एक भूमिका रंगविणार आहे. अमानवी शक्तींवरील नजर या मालिकेत शर्लिन लवकरच एका अनोख्या रूपात दिसणार आहे. तिचे हे रूप पाहून प्रेक्षकांना ही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही आहे.  

सूत्रांच्या माहितीनुसार, “शर्लिनचे पडद्यावरील व्यक्तित्त्व भारून टाकणारे असते. त्यामुळे या भूमिकेसाठी आम्ही सर्वप्रथम तिच्याच नावाचा विचार केला होता. या मालिकेत ती एक डाकिणीच्या अवतारात दिसणार असून ती मोहना डायनच्या (मोनालिसा बिस्वास) विरोधात असेल. दोन शक्तिशाली शैतानी स्त्रिया एकमेकींसमोर उभ्या ठाकल्यावर त्यांच्यातील शक्तींचे प्रयोग प्रेक्षक थक्क होऊन पाहात राहातील.”

आजवर अनेक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या या अभिनेत्रीने आता काही गंभीर भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला असून नजरमधील भूमिकेबद्दल ती स्वत: खूप उत्सुक बनली आहे. आता ग्लॅमरस अवतारात ती छोट्या पडद्यावर आपली जादू दाखवण्यास पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.

‘नजर’ मालिकेत प्रेक्षकांना वारंवार अनपेक्षित धक्के बसत असतात आणि बरेचदा अंगावर भीतीचा काटा आणणाऱ्या  अमानवी शक्तींचे दर्शन घडत असते. मोहना ही डायन आपली मुलगी रूबी आणि अंश राठोड यांचा विवाह कधी होत आहे, याची आतुरतेने वाट बघत असते. कारण तसे झाल्यास तिला तिच्या शक्ती परत मिळणार असतात. पण अंशच्या आयुष्यात पियचाही प्रवेश झाला आहे. प्रेक्षकांना आता सुष्ट-दुष्टांमधील तीव्र संघर्ष पाहायला मिळणार असून त्यामुळे त्यांच्यातील उत्कंठा वाढली आहे.

टॅग्स :नजर