Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेखर सुमन म्हणतो, ही गोष्ट माझ्यासाठी सर्वकाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 20:30 IST

शेखर सुमन लाइट्स, कॅमेरा, किस्सेचा तिसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचे सूत्रसंचालन शेखर सुमन करत आहेत.

ठळक मुद्देशेखर सुमन लाइट्स, कॅमेरा, किस्सेचा तिसरा सीझन नुकताच आला प्रेक्षकांच्या भेटीला

शेखर सुमन लाइट्स, कॅमेरा, किस्सेचा तिसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचे सूत्रसंचालन शेखर सुमन करत आहेत. त्याने हे नवे पर्व अधिक रंजक असल्याचे सांगितले. 

शेखर सुमन म्हणाला की, मला वाटते हे पर्व अधिक रंजक झाले आहे. कारण यावेळी अधिक संशोधन करून अधिक रंजक गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. लाइट, कॅमेरा, किस्सेच्या या पर्वात अधिक संशोधनासह गोष्टी अधिक औत्सुक्याच्या झाल्या आहेत. पहिले दोन पर्व फारच यशस्वी झाले. प्रेक्षकांना ते आवडले. व्यक्तिगत पातळीवरही, मी माझा शोपाहतो. पण, माझ्यासाठी नाही तर त्यातील कंटेंटसाठी. यातील गोष्टी फार रंजक असतात. त्यामुळे, पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांसोबत प्रेक्षक जोडले जातात. मी सिनेप्रेमी आहे. मी मोठा झालोय तेच सिनेमा पाहत, सिनेमा खात, सिनेमासोबतच झोपत. सिनेमा माझ्यासाठी सर्व काही आहे. सिनेमासंदर्भातील काहीही माझे लक्ष वेधून घेते. त्यामुळे सिनेमाच्या कार्यक्रमासाठी माझी निवड नैसर्गिकच आहे.लाईट्, कॅमेरा, किस्सेबद्दल सर्वाधिक आवडणारी बाब कोणती असे विचारल्यावर शेखर सुमनने सांगितले की, आपला देशच गोष्टी सांगणारा आहे. आपले सगळे बालपण आजी आणि आईकडून गोष्टी ऐकणे हे असते. त्यामुळे आपण सतत गोष्टींच्या सानिध्यात असतो. ही आपले आयाम वाढवणारी प्रक्रिया आहे. या कथांना नव्याने समोर आणण्यात मजा असते. प्रेक्षकांसोबत शेकडो गोष्टी शेअर करण्याचा मला आनंद आहे आणि ही संधी मिळणे हा माझाच सन्मान आहे.

टॅग्स :शेखर सुमन