शेखरचा खास परफॉर्मन्स वडिलांसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 17:43 IST
द वॉईज इंडिया किड्स या कार्यक्रमाचा यंदाचा भाग हा फॅमिली स्पेशल असणार आहे. या भागात सगळ्या स्पर्धकांचे आणि त्यांच्या ...
शेखरचा खास परफॉर्मन्स वडिलांसोबत
द वॉईज इंडिया किड्स या कार्यक्रमाचा यंदाचा भाग हा फॅमिली स्पेशल असणार आहे. या भागात सगळ्या स्पर्धकांचे आणि त्यांच्या परीक्षकांचे कुटुंब हजेरी लावणार आहेत. या खास भागामध्ये शेखरचे वडील हसमुख रवजियानी येणार आहेत. हसमुख हे केवळ शेखरचे वडीलच नाहीत तर त्याचे गुरूदेखील आहेत. बॉलिवूड संगीतजगतात हसमुख हे खूपच प्रसिद्ध आहेत. राज कपूर यांच्या प्यार हुआ इकरार हुआ, आवारा हूँ यांसारखी गाणी हसमुख शेखरसोबत गाणार असून वाद्यही वाजवणार आहेत. शेखर सांगतो, "मी आज जे काही आहे ते केवळ माझ्या पालकांमुळे आहे. पालकांनी आपल्या पाल्याला चांगले संस्कार दिले तर त्यांना दुसरे काहीही शिकवण्याची गरज पडत नाही. माझ्या पालकांनी, पत्नीने आजवर मला दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचा आभारी आहे."