Join us

​शशांकचा कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 20:28 IST

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील प्रेक्षकांचा लाडका श्री म्हणजेच अभिनेता शशांक केतकर लवकरच मालिकेत झळकणार आहे.‘होणार ...

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील प्रेक्षकांचा लाडका श्री म्हणजेच अभिनेता शशांक केतकर लवकरच मालिकेत झळकणार आहे.‘होणार सून मी या घरची’ ही मालिका संपल्यानंतर तो छोट्या पडद्यापासून दूर राहिला होता. पण तो लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.काहीच दिवसांत शशांक त्याच्या या नव्या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांचे दिग्दर्शक विनोद लवेकर करणार आहेत.एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना मला नव्या मालिकेत पाहायला मिळणार असून माझ्या आवडत्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा मला अधिक आनंद होत आहे. तसेच या मालिकेची स्टारकास्ट ही प्रचंड तगडी असणार असल्याचे तो सांगतो.