Join us

शशांक केतकर मालिकेच्या शूटिंगसाठी झाला रवाना, म्हणाला - 'हा प्रवास करतोय फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 13:50 IST

शशांक केतकर याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एअरपोर्टवरील फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. राज्याची वाटचाल पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने होत आहे. अशात मनोरंजनाला ब्रेक लागू नये, यासाठी वाहिन्यांकडून खबरदारी घेतली जात आहे. स्टार प्रवाह, झी मराठी वाहिनीवरील दैनंदिन मालिकांचे शूट आता महाराष्ट्राबाहेर होणार आहे. अभिनेता शशांक केतकर देखील मालिकेच्या शूटिंगसाठी दुसऱ्या राज्यात गेले आहेत. यावेळी एअरपोर्टवरून फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

शशांक केतकर याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एअरपोर्टवरील फोटो शेअर करत त्याने म्हटले की, हा प्रवास आम्ही करतोय तो फक्त प्रेक्षकांचा मनोरंजनचा प्रवास खंडित न होता, अजून मनोरंजक व्हावा म्हणून.सर्व प्रेक्षकांचे आशीर्वाद आणि प्रेम कायम राहूदे. आम्ही आमची काळजी घेऊच ...तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या.

शशांकने फेब्रुवारी महिन्यात बाबा झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. त्यावेळी त्याने बाळाचा फोटो शेअर करत त्याचे नाव ऋग्वेद ठेवल्याचे सांगितले.

सध्या शशांक केतकर झी मराठी वाहिनीवरील पाहिले न मी तुला या मालिकेत काम करतो आहे. या मालिकेत तो पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळतो आहे. मात्र त्यामुळे त्याला ट्रोलही करण्यात आले होते.  

काही दिवसांपूर्वी शशांक सोशल मीडियावर लाईव्ह आला होता. चाहत्यांसह संवाद साधत होता. तितक्यातच एका युजरने असभ्य भाषेत त्याला कमेंट केली. यावरच शशांकचा पारा चांगलाच चढला. कलाकारांनासुद्धा रिस्पेक्ट द्या, अधिक पुण्य लाभेल टीका करणा-या युजरला शशांकनेही चांगलेच सुनावले होते. 

टॅग्स :शशांक केतकरझी मराठी