Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sharmila Thackeray : उर्फी जावेद प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची जबरदस्त प्रतिक्रिया, म्हणाल्या 'मी तर पूर्ण कपड्यात...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 11:03 IST

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद अजुनही सुरुच आहे त्यात आता शर्मिला ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

Sharmila Thackeray : उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांमुळे नेहमीच ट्रोल होत असते. अनेक जण तिच्या अशा वागण्यावर टीका करतात तर काही तिला पाठिंबा देतात. मनोरंजन क्षेत्रातील लोकांनी तर तिच्यावर टीका केलीच आहे पण आता राजकारण्यांचीही तिच्यावर प्रतिक्रिया येऊ लागली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यातील वाद अजुनही सुरुच आहे त्यात आता शर्मिला ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. उर्फीच्या कपड्यांवर शर्मिला ठाकरे यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.

नवी मुंबईतील एका कार्यक्रमात शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले. उर्फीच्या कपडे घालण्याच्या स्टाईलवर तुमची प्रतिक्रिया काय असे पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दोन वाक्यात अगदी मिश्कील पण जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, 'मी पूर्ण कपड्यात फिरते. बाकीच्यांचे मला माहित नाही.' असं उत्तर देऊन त्या लगेच निघून गेल्या.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. उर्फीवरुन तर आता राजकारणही तापले आहे. 'उर्फी ला बेड्या ठोका, महिला आयोगाने आत्तापर्यंत काहीच कसे केले नाही' अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. तर दुसरीकडे उर्फीनेच महिला आयोगाकडे चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केली आहे. 

उर्फीचे वकील म्हणतात...उर्फी जावेदच्या वतीने तक्रार दाखल करणारे तिचे वकील नितीन सातपुते यांनी उर्फीच्या जीवाला धोका असल्याचे म्हटलं आहे.  मॉडेल उर्फी जावेदला चित्रा वाघ उघडपणे धमकी देत आहेत. उर्फीच्या जीवाला धोका आहे. चित्रा वाघ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उर्फी जावेदचे मॉब लिंचिंग होण्याची शक्यता आहे. ते सातत्याने उर्फीला सोशल मीडिया आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्रास देत आहेत. तरीही वाघ यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. उर्फी जावेदच्या जीवाचे बरे वाईट होण्याची वाट पाहत आहेत का? आम्ही महिला आयोगाला तक्रार केली आहे. उर्फी विशिष्ट समाजाची असल्याने वाघ तिला टार्गेट करत आहेत. आम्ही आमच्या परिने तक्रार केली आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :उर्फी जावेदशर्मिला ठाकरेचित्रा वाघ